Indurikar Maharaj : 'ज्यांना बोंबलायचंय...'; महाराजांच्या नव्या निर्णयाने सारेच पडले बुचकळ्यात, नवा वाद

काही दिवासांपूर्वीच फेटा खाली ठेवण्याची भाषा करणारे इंदुरीकर महाराज आणखी एका वक्तव्यामुळे पुन्हा फॉर्मात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Indurikar Maharaj latest statement : इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. सर्वाधिक चर्चा त्यांनी लग्न समारंभाबाबत केलेल्या वक्तव्याची आहे. 'जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण..' ही उक्ती इंदुरीकर महाराजांसाठी वापरली जात आहे. कीर्तनांमधून दुसऱ्यांच्या लेकीबाळींची मापं काढणारे इंदुरीकर स्वत:च्या मुलीवर टीका झाली तेव्हा व्यथित झाले, अशा शब्दात सोशल मीडियावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषा केली. मात्र त्याच्या काही दिवसात इंदुरीकर महाराजांनी असा काही निर्णय घेतला त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

इंदुरीकर महाराजांचा मोठा निर्णय

काही दिवासांपूर्वीच फेटा खाली ठेवण्याची भाषा करणारे इंदुरीकर महाराज पुन्हा फॉर्मात आले आहेत. आता तर म्हणे मुलीचं लग्न जोरातच करणार. 'ज्यांना बोंबलायचंय त्यांनी बोंबला' अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी ट्रोलला प्रत्युत्तर दिलं आहे. याच महिन्यात इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. 

इंदुरीकर महाराजांच्या साखरपुड्याचा थाट... 

ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एन्ट्री भव्य रथातून झाली. या साखरपुड्याला इंदुरीकरांनी किती खर्च केला पाहा. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या साखरपुड्याला अडीच हजार पाहुणे उपस्थित होते. जेवणाची थाळी - प्रत्येकी अंदाजे 150 रुपये होती. लॉनचं भाडं - 1 लाख रुपये, सजवलेल्या वाहनांची संख्या - 25, स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी, वधू-वराच्या आगमनासाठी भव्य रथ, साखरपुड्यात फोटोग्राफर, रील मेकर, साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळीही उपस्थित होती. 

एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्याप्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यात आपलेच उपदेश विसरले, असं म्हटलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Farmers News:'ही' पिकं घ्या अन् खात्यात 50 हजार मिळवा; 'लाडक्या शेतकऱ्यां'साठी सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा

इंदुरीकर महाराजांना आपलंच कीर्तन लक्षात राहिलं नाही. पण नेटकऱ्यांनी इंदुरीकरांना इतक्या सहजासहजी सोडलं नाही. लेकीच्या शाही साखरपुड्यावरून चांगलंच सुनावलं. साखरपुड्यात इंदुरीकरांच्या लेकीने घातलेले कपडे, तिने केलेला नाच त्यांच्या कीर्तनातील उपदेशांसोबत किती मिळताजुळता होता याची आठवण करून दिली. आणि हीच टीका इंदुरीकरांच्या जिव्हारी लागली. लोकांच्या टीकेने इंदुरीकर इतके व्यथित झाले की थेट फेटा खाली ठेवायचा विचार केला.

Advertisement
माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. कुटुंबापर्यंत गेल्यावर मजा नाही. याची अक्कल इंदुरीकरला यायलाच पाहिजे, त्यानं कीर्तन बंद केलंच पाहिजे आता इंदुरीकरांनी फेटा ठेवून द्यावा - इंदुरीकर महाराज 

 
इंदुरीकरांनी फेटा खाली ठेवायचा विचार केला. पण काही वेळापुरताच होता. कारण पुन्हा एकदा टीकांकारांची भीडभाड न बाळगता इंदुरीकर लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावणार आहेत. अर्थात लेकीचं लग्न कसं करावं हा सर्वस्वी इंदुरीकरांच्या इच्छेचा विषय आहे. पण किमान इथून पुढे कीर्तनांमधून दुसऱ्याच्या लेकीबाळींची मापं काढताना आपल्या घरात काय घडलंय याचाही विचार करावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.