अयोद्ध्या राम जन्मभूमीचा ऐतिहासिक निकाल तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी दिला होता. हा निकाल आपण कसा दिला याच्या मागचं गुपीत पहिल्यांदाच धनंजय चंद्रचुड यांनी सांगितलं आहे. चंद्रचुड हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते त्यांच्या मुळ गावी म्हणजे खेड तालुक्यातील कन्हेरसर इथे आले होते. त्यावेळी त्यांनी अयोद्धेचा निकाल देणे कसे अवघड होते? त्यातून कसा मार्ग काढला याचा खुलासाच केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशाचे माजी सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचे मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील कन्हेरसर येथे सहपत्नी भेट दिली. यावेळी ते पारंपारिक पोशाखात कुलदैवत यमाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांचे स्वागत करण्यात आले. धनंजय चंद्रचुड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच मुळगावी आले होते. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत करुन त्यांचा सन्मान केला.
ट्रेंडिंग बातमी - BJP First List : भाजपची पहिली यादी जाहीर, 99 उमेदवारांचा समावेश
यावेळी त्यांनी अयोद्धेच्या निकालाबाबत आतली गोष्ट सांगितली. अयोद्धेच्या केसची सुनावणी माझ्या पुढे आली होती. त्यावर तीन महिने विचार करत असताना एक जाणवलं. शेकडो वर्ष प्रलंबित राहिलेला विषय आमच्यापुढे आला. त्यावेळी यावर मार्ग कसा काढायचा असा प्रश्न समोर आला होती. त्यावेळी देवाच्या समोर बसुन अयोद्धेचा मार्ग तुम्हीच शोधुन द्या अशी विनंती देवांना केली. आपला विश्वास आणि आस्था असेल तर मार्ग देव शोधुन देतातच अशी भावना यावेळी धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली.