संकेत कुलकर्णी
सध्या तापमान वाढत आहे. उन्हामुळे सर्वच जण हैरणा झाले आहेत. उकाड्यानं जीव कासाविस होत आहे. सावली कशी मिळेल, गारवा कसा मिळेल याचा विचार प्रत्येक जण करत आहे. अनेक गाड्या या उन्हात उभ्या असतात. त्यामुळे गाडीत ही प्रचंड गरम होते. एसी असला तरी त्याचा तेवढा उपयोग होत नाही. यावर आयुर्वेदीक डॉक्टराने देशी जुगाड करत एक नामी शक्कल लढवली आहे. त्याच्या या देशी जुगाडाने त्यांची कारमात्र भर उन्हात उभी राहूनही गारेगार राहाते. त्यामुळे त्यांच्या या देशी जुगाडचे कौतूक होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉक्टर रामहरी कदम हे पंढपूरचे आहे. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांच्याकडे पंधरा लाखाची अलिशान कार आहे. पण वाढत्या उन्हा मुळे त्या कारमध्ये बसवत नाही. एसीही हवा तसा काम करत नाही. कार बाहेरून गरम होत असल्याने आतील तापमान एसी असला तरी गारेगार राहत नाही. त्यावर डॉक्टर साहेबांनी एक नामी शक्कल शोधून काढील. त्यांनी आपल्या आयुर्वेदातील अनुभव या ठिकाणी कामी आणला आणि आपली गाडी गारेगार करून घेतली.
त्यासाठी त्यांनी आधी गाडीवर देशी गाईचे शेण आणि गोमुत्र यांच्या मिश्रणाचा लेप लावला. संपूर्ण गाडीला हा लेप लावण्यासाठी आठ दिवस लागेल असं कदम सांगतात. त्यानंतर ही गाडी उन्हात जरी उभी केली तरी त्यावर उन्हाचा काही एक परिणाम होत नाही. उलट पन्नास टक्के तापमान कमी होते असा दावा ही कदम यांनी केला आहे. शेण आणि गोमुत्रामध्ये काही शास्त्रीय तत्व आहेत त्यामुळेच हे तापमान कमी होते असंही कदम यांनी सांगितलं.
हा लेप लावल्याने रोज गाडी धुण्याची गरज पडत नाही. फक्त काचा पुसल्या की काम होतं. विशेष म्हणजे हा लेप लावल्यामुळे गाडीत बसल्यानंतर एसीची ही गरज लागत नाही. निम्मं तापमान हे शेणामुळे कमी होतं. गाडीत गारवा जाणवतो असंही त्यांनी सांगितलं. या आधी ही आपण असा प्रयोग केला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांची गाडी दिवसभर उन्हात राहाते. तरही गाडी केवळ या शेणाच्या लेपामुळे गारेगार राहते.