
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. ही हत्या कशी झाली हे आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं गेले. या हत्ये वेळचे फोटोही व्हायरल झाले होते. आता मात्र उपलब्ध पुराव्यासह विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी खून कसा झाला? तो कुणी केला? या मागे कोण कोण होते? त्याबाबतचे पुरावे काय आहेत या बाबी कोर्टासमोर मांडल्या. या प्रकरणातील साक्षिदार गोपनिय ठेवावेत, आरोपींची संपत्ती जप्त केली जावी अशी विनंती कोर्टाला करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी निकम यांनी दिली आहे. संतोष देशमुख खून खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. ही घटनांची एक मालिका आहे. यात प्रत्यक्ष पुरावा नसला तरी कागदपत्रं आणि सायंटिफिक पुरावे आहेत असं निकम यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख खुन खटल्याला सुरूवात झाली आहे. याबाबत सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टात मांडली. हा खून म्हणजे एक कट होता. त्यात दोन पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा ही या कटात सहभागी होता, असं सुरूवातीला निकम यांनी कोर्टात स्पष्ट केलं. शिवाय या खटल्यातील महत्वाचे साक्षिदार आहेत, त्यांची ओळख गोपनिय ठेवावी. आरोपींची संपत्ती जप्त करावी अशी विनंती केली कोर्टाला अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी सीआयडी- एसआयटीचे प्रमुख कोर्टाक हजर होते.
या प्रकरणात जे काही पुरावे आहेत त्यानुसार हा सर्व घटना क्रम 8 ऑक्टोबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत घडला आहे. या दिवसांची संपूर्ण मालिका निकम यांनी कोर्टा पुढे मांडली. या काळात घडलेल्या प्रत्येक घटनेचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा निकम यांनी केला. या प्रकरणावरून संघटीत गुन्हेगारी कशी फोफावली आहे हे समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून वागत होता असंही निकम यांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणात जे काही पुरावे आहेत त्याचा कागद आरोपींच्या वकीलांनी मागितल्याचं ही निकम यांनी यावेळी सांगितलं. 10 एप्रिलला आरोपींवर आरोप निश्चित केले जावेत अशी विनंतही या वेळी करण्यात आले.
जे पुरवे मिळाले आहेत त्यात मुख्य करून सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, आरोपींची गोपनिय मिटींग, 7 डिसेंबर 2024 ला हॉटेलमध्ये झालेली मिटींग, तीथ एकत्र आलेले आरोपी याची सर्व कागदपत्र आरोपींच्या वकीलांनी मागितली आहे. अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यावरून या प्रकरणाला सुरूवात झाली. ही कंपनी मस्साजोग पासून दिड किलोमिटरवर आहे. या गावची 30 एकर जमीन या कंपनीने घेतली आहे. त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी इथं नोकरी देण्यात आली आहे. सर्व घटनाक्रम हा 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होतो.परळी इथं जगमित्र कार्यालय आहे. या कार्यालयात वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे याची बैठक झाली. या बैठकीतच अवादा कंपनीकडून 2 कोटीची खंडणी घेण्याचे ठरले.
ट्रेंडिंग बातमी - Ghost Tree : वर्ध्यातील जंगलात 'भुताचे झाड', रात्रीच्या अंधारात दिसतंय पाढरं शुभ्र
त्यानुसार अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी खोपटे यांनी भेटीसाठी बोलावण्यात आले. भेटीला आल्यानंतर वाल्मीक कराडने त्यांनी धमकी दिली. शिवाय त्यांच्याकडे दोन कोटीची मागणी ही करण्यात आली. दोन कोटी द्या नाही तर कंपनी बंद करा असं धमकावण्यात आलं. याचाही पुरावा उपलब्ध आहे. पुढे दुसऱ्या दिवशी संबधीत अधिकाऱ्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना आणि दिल्लीत कळवली. त्यावर पोलिस तक्रार देवू नका. ती माणसं मोठी आहेत, असं सांगून कंपनीने तक्रार दिली नाही. पुढे सुदर्शन घुले हा 26 नोव्हेंबर 2024 ला अवादा कंपनीत गेला होता. घुलेने तिथे ही धमकी दिली. खंडणी द्या, वाल्मीकने सांगितलं ते करा नाही केलं तर काम करता येणार नाही. बीडमध्ये कुठेही काम होवू देणार नाही. याचे ही सीडीआर पुरावे म्हणून आहेत असंही निकम यांनी स्पष्ट केलं.
29 नोव्हेंबरला वाल्मीक कराडने पुन्हा सुनिल शिंदे या अधिकाऱ्याला बोलावले. त्याला विष्णू चाटेच्या फोन वरून फोन करण्यात आला. त्यावेळी सुनिल शिंदेंने फोन स्पिकरवर ठेवला होता. शिवाय कॉल रेकॉर्ड ही केला. यावेळी थोपटे हे अधिकारीही तिथे होते. हे कॉल रेकॉर्डींग तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले यांने पुन्हा अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली. याचे तर व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. पुढे 6 डिसेंबर अवादा कंपनी बाहेर वाद झाला. तिथे मारहाण ही झाली. यावे पोलिस ही तिथे पोहोचले. त्यांनी तिघांना अटक केली. त्यात सुदर्शन घुले ही होता असं निकम यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर 7,8 आणि 9 डिसेंबरला पुढच्या घटना घडल्या 9 तारखेला देशमुख यांचा खून झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world