Success Story : शेतकरी कन्येचा वैद्यकीय क्षेत्रात डंका;  डॉ. गौरी झोळ यांची 'MD डर्मेटोलॉजी'साठी निवड

Success Story : गौरी यांचा शालेय शिक्षण शारदानगर, बारामती येथे झालं.  त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.  बारावीनंतर त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

जिद्द, चिकाटी आणि पालकांचा भक्कम आधार असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे सोलापूरच्या डॉ. गौरी अनुरथ झोळ यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या एम.डी. डर्मेटोलॉजी (MD Dermatology) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, त्यांच्या या यशाने करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शेतकरी कुटुंबाची स्वप्नपूर्ती

वाशिंबे (ता. करमाळा) हे डॉ. गौरी यांचे मूळ गाव. मातीशी नाते जपणाऱ्या आणि कष्टाची जाण असणाऱ्या झोळ कुटुंबात गौरी यांचे बालपण गेले. त्यांचे वडील अनुरथ झोळ आणि आई लक्ष्मी झोळ यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. घरात असलेली शिस्त, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची ओढ यामुळेच गौरी यांनी हे यश संपादन केले आहे.

गौरी यांचा शिक्षणासाटी बारामती ते मुंबई प्रवास

गौरी यांचा शालेय शिक्षण शारदानगर, बारामती येथे झालं.  त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.  बारावीनंतर त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केली. त्यानंतर त्यांना शिक्षण न थांबवता आपल्या प्रवास सुरूच ठेवला. आता त्यांची एम.डी. डर्मेटोलॉजीसाठी निवड झाली आहे.  'सकाळ' ऑनलाईनने याबबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा- Success Story: दिसायला लहान पण कर्तृत्व महान! 22 व्या वर्षीच IPS अधिकारी, कोण आहे हा मराठी तरुण?)

"हे यश माझे नसून आई-वडिलांच्या कष्टाचे"

आपल्या यशाबद्दल बोलताना डॉ. गौरी भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "वडील अनुरथ झोळ यांनी माझ्या स्वप्नांना बळ दिले, तर आईने प्रत्येक टप्प्यावर मला धीर दिला. त्यांच्या कष्टाची ही पावती आहे. डॉक्टर म्हणून आता माझी जबाबदारी वाढली असून, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची सेवा करणे हेच माझे पुढील ध्येय असेल."

Advertisement

(नक्की वाचा- Success Story: 20 रूपयांची मॅगी विकून महिन्याला कामावतो लाखो, समोर आले कमाईचे थक्क करणारे गणित)

ग्रामीण मुलींसाठी प्रेरणा

डॉ. गौरी यांची ही यशोगाथा केवळ एक शैक्षणिक प्रगती नाही, तर ती ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीला मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस देते. त्यांची बहीण मानसी झोळ हिने देखील आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात (BBA International Business) शिक्षण पूर्ण केले आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हाच संदेश या झोळ भगिनींच्या प्रगतीतून मिळतो. डॉ. गौरी यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

Topics mentioned in this article