IPL 2025: '14 नव्हे तो...' वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत जवळच्या व्यक्तीनेच सांगितलं, VIDEO व्हायरल

Vaibhav Suryavanshi Age Latest News: आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. मुंबईकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vaibhav Suryavanshi Age Viral Video: आयपीएलच्या मैदानात सध्या वैभव सूर्यवंशी  या युवा खेळाडूची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत या 14 वर्षीय खेळाडूने नवा इतिहास रचला. त्याच्या या खेळीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह क्रीडा विश्वातील दिग्गजांनी तोंडभरुन कौतुक केले. अशातच आता वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत उलटसुलट दावे केले जात असून एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठोकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात खाते न उघडताच बाद झाला. गुरुवारी, मुंबई इंडियन्सविरुद्ध तो दीपक चहरच्या चेंडूवर बाद झाला. अशातच सध्या माध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की वैभवचे खरे वय 14 वर्षांचे नाही तर 16 वर्षे आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लोक दिसत आहेत. ते व्हिडिओमध्ये सांगतात की "ते समस्तीपूर, बिहारचे रहिवासी आहेत वैभव सूर्यवंशी त्याच्यासोबत खेळायचा, तो त्याला गोलंदाजी करून सराव करायला लावायचा. त्याला घडवण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. ते  आम्हाला दररोज पाटण्याला घेऊन जायचे, बोलवायचे, पार्ट्या करायच्या, आम्ही त्याच्यासमोर गोलंदाजी करून त्याला सराव करायचो."

ट्रेंडिंग बातमी - India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही?

तो व्यक्ती पुढे म्हणतो की "तो (वैभव) संयमी खेळणारा माणूस नाहीये, तो जिथे जिथे खेळला आहे तिथे त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे. बिहारमधील एक मुलगा स्वतःसाठी नाव कमवत आहे याचा त्याला अभिमान आहे. पण त्याचे वय 14 वर्षे दाखवले जात आहे याचे त्याला दुःख आहे. त्याचे खरे वय सांगितले असते तर अधिक मजा आली असती. त्याचे खरे वय 16 वर्षे आहे."

Advertisement

दरम्यान,  आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने 35 चेंडूत शतक झळकावले, जे आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही भारतीयाने केलेले सर्वात जलद शतक आहे. तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. मुंबईकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.