जाहिरात

India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही?

Team India Squad For England Tour : आयपीएल स्पर्धेची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आयपीएलनंतर लगेच भारतीय टीम इंग्लंडला रवाना होणार आहे.

India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही?
मुंबई:

Team India Squad For England Tour : आयपीएल स्पर्धेची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आयपीएलनंतर लगेच भारतीय टीम इंग्लंडला रवाना होणार आहे. दोन्ही देशांमधील पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी ही सीरिज प्रतिष्ठेची आहे. या सीरिजसाठी 35 खेळाडू शॉर्टलिस्ट करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ या सीरिजमध्ये भारतीय टीमचा कॅप्टन कोण असेल? याबाबतचाही निर्णय झाल्याची माहिती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजबाबत 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सीरिजसाठी टीम इंडियाचा कॅप्टन असेल. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मिळालेला धक्कादायक व्हाईटवॉश तसंच  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरी यामुळे रोहितच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, तो पुन्हा एकदा कॅप्टन राहण्याची शक्यता आहे.

या वृत्तानुसार टीम इंडियामधील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि करुण नायर (Karun Nair) हे प्रबळ दावेदार आहेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफीसह सध्या सुरु असलेली आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांना निराशा सहन करावी लागू शकते. 

IPL 2025 : मुंबई इंडियन्सला धक्का, दमदार कामगिरी करणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट

( नक्की वाचा :  IPL 2025 : मुंबई इंडियन्सला धक्का, दमदार कामगिरी करणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट )

कशी असेल टीम इंडिया?

इंग्लंड दौऱ्यात अनुभवी कॅप्टनची गरज आहे, असं बीसीसीआयचं मत आहे. त्यामुळे रोहितला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरमध्ये मुंबईकर सर्फराज खानला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी सध्या फॉर्मात असलेल्या करण नायर आणि रजत पाटीदार यांचा विचार करण्यात येत आहे. या दोघांपैकी किमान एकाची इंडिया A टीममध्ये निवड केली जाईल. श्रेयस अय्यरला मागील वर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर टेस्ट टीममधून वगळण्यात आलं होतं. त्याला इंग्लंड सीरिजमध्ये संधी द्यायची की नाही याबाबत अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत असलेला गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनचा (Sai Sudharsan ) राखीव ओपनर म्हणून टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. त्याला टीम इंडियात संधी मिळाली नाही तर तो इंडिया A टीमचा सदस्य निश्चित आहे. 

कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) समावेश देखील निश्चित मानला जात आहे. भारताबाहेर होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी कुलदीपचा विचार करण्यात येत नव्हता. पण, आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर स्पिन अ‍ॅटॅक मजबूत करण्यासाठी त्याचा समावेश होऊ शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची टीममधील निवड निश्चित आहे. पण, तिसरा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजमध्ये सातत्य नसल्यानं निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: