Jalgaon News: अज्ञात वाहनाने रिक्षाला चिरडलं, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत, जळगाव हळहळलं

अपघातानंतर दोघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून ऑटो रिक्षाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हीट अँड रनची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता जळगावमधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील निमखेडी रोडवर अज्ञात वाहनाची ऑटो रिक्षाला धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा शोध सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील निमखेडी रोडवर अज्ञात वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिली असून या अपघातात दोन सख्ये भाऊ जागीच ठार झाले आहे. ज्ञानेश्वर शिवदे व प्रमोद शिवदे असे अपघातात ठार झालेल्या भावनांची नावे असून हे दोन्हीही भावंड पाणीपुरीचा व्यवसाय करत होते. दरम्यान अपघातानंतर दोघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून ऑटो रिक्षाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

लातूर  उदगीर राज्य मार्गावरील नरसिंगवाडी पाटीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अयशर टेम्पोची पोकलेन घेऊन नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (3 जून) दुपारी दिडच्या सुमारास घडला. निंगप्पा इरप्पा पाटील (वय 50 वर्षे, रा. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला मागून ट्रॅव्हल्स धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस व नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे. 

Advertisement