Jalgaon Accident: ST बस, कार, दुचाकीचा भीषण अपघात, 5 जणांचा दुर्दैवी अंत, साखरपुड्याला निघाले अन्...

अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Accident:  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या मंगरूळ गावाच्या शिवारात आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. एसटी बस, कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या तिहेरी अपघातात तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण अमळनेर परिसरात शोककळा पसरली आहे. 

Crime News: भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला! परिस्थिती सुधारली अन् भावकीच्या नजरेत खुपलं, आधी जागा शोधली मग...

जळगावमध्ये भीषण तिहेरी अपघात, 5 ठार 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार, मोटारसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

गुजरातमधून सारखपुड्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनाचा अपघात झाला. घटनेनंतर मंगरूळ ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून पोलिस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

वसईत अपघात, वृद्ध दांपत्य जखमी 

दुसरीकडे, वसईच्या सनसिटी परिसरात इंडिकेटर न देता अचानक स्कुटी आडवी घेतल्याने भीषण अपघात घडून वृद्ध दांपत्यासह दोन तरुण जखमी झाला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात वृद्ध दांपत्याने कोणताही इशारा न देता रस्त्याच्या मध्यभागी स्कुटी वळवल्याने मागून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत मोटरसायकल चालक अमित आस्वेकर आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले, तर वृद्ध दांपत्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

Hingoli News: संतापजनक! 5 दिवसांचे अर्भक झुडपात फेकलं, निर्दयी माता- पित्याचा शोध सुरु