जाहिरात

Crime News: भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला! परिस्थिती सुधारली अन् भावकीच्या नजरेत खुपलं, आधी जागा शोधली मग...

चुलत भावानेच आपल्या सख्या चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित संजय बन्सोड या नराधमाने राजू रामू बन्सोड या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे हत्या केली. 

Crime News: भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला! परिस्थिती सुधारली अन् भावकीच्या नजरेत खुपलं, आधी जागा शोधली मग...

Chhatrapati Sambhajinagar Crime:  चुलत भावाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आणि त्याउलट आपलं कुटुंब मागे राहत असल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरून गेले असून, सिडको पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Hingoli News: संतापजनक! 5 दिवसांचे अर्भक झुडपात फेकलं, निर्दयी माता- पित्याचा शोध सुरु

चुलत भावाकडून सख्ख्या चुलत भावाची हत्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भावकीच्या मनात साचलेला टोकाचा मत्सर किती भयंकर असू शकतो, याचा थरकाप उडवणारा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. एका चुलत भावानेच आपल्या सख्या चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित संजय बन्सोड या नराधमाने राजू रामू बन्सोड या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे हत्या केली. 

महत्त्वाचं म्हणजे ​हा काही अचानक रागाच्या भरात झालेला खून नव्हता, तर आरोपी रोहितने याचा पद्धतशीर कट रचला होता. हत्या करण्याच्या दोन दिवस आधीच रोहितने पाथ्री येथील एका निर्मनुष्य जंगलाची रेकी केली होती. कोणती जागा हत्येसाठी सुरक्षित आहे, याची त्याने आधीच पाहणी केली. २३ मे रोजी त्याने राजू याला जुन्या वादाचा बहाणा सांगून विश्वासात घेतले.

"जंगलात एक सुरा लपवून ठेवला आहे, तो काढायला सोबत चल," अशी विनंती करून त्याने राजूला पाथ्रीच्या जंगलात नेले आणि तिथेच त्याच सुऱ्याने क्रूरतेने राजूवर सपासप वार करत त्याला संपवले. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

40 किलोमीटरवरून बिर्याणी खायला आले, पण प्लेटमध्ये जे दिसले...; आता थेट तुकाराम मुंढेंकडे होणार तक्रार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com