Gudi Padwa gold purchase : साडेतीन मुहूर्तापैंकी एक मुहूर्त असणारा सण म्हणजे गुढीपाडवा. भारतीय संस्कृतीत या निमित्ताने सोन्याची खरेदी करण्याची प्रथा आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्यात 18 हजारांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने विक्रमी 90 हजारांचा टप्पा गाठला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत 25 ते 30 कोटींची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% सोनं खरेदीत वाढ झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या वर्षीपेक्षा या गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात 18 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तरीही सोनं खरेदी करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. पारंपरिक दागिन्यांसह सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याच्या नाण्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक दागिन्यांसह गुंतवणुकीसाठी सोन्याच्या कॉईनला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
नक्की वाचा - वेताळ शेळके महाराष्ट्र केसरीचा मानकरी, पृथ्वीराज पाटीलला आस्मान दाखवलं!
राज्यभरात बेरोजगारीची चिंता व्यक्त केली जात असताना गुढीपाडव्याच्या निमित्ताने जळगावात मात्र सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.