Jalgaon News: "जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर", गिरीश महाजनांना धक्का? प्रकरण काय?

विजयी उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी असून देखील त्यांचे अर्ज वैद्य कसे ठरवण्यात आले असा प्रश्न देखील प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Municiple Corporation Election: राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता संपली असून महापौरांच्या निवडीही पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये महायुतीने सर्वाधिक शहरात सत्ता खेचून आणली आहे. एकीकडे महापौरपदाच्या निवडीनंतर जल्लोष सुरु असतानाच जळगावमधून मोठी अपडेट समोर आली आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया हे बेकायदेशीर असल्याचा दावा प्रजाशक्ती क्रांती दलाचा पत्रकार परिषदेतून आरोप करण्यात आला आहे.

Malegaon News: टिपू सुलतानच्या मुद्यावर मालेगाव पेटले! शिवसेनेच्या इशाऱ्याला उपमहापौरांचं उत्तर, वाद चिघळणार?

महापौरपदाची निवड अडचणीत? 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया ही बेकायदेशीर पणे राबवल्या गेल्याचा आरोप प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने करण्यात आला आहे. या निवडणुकीत विजयी झालेले महापौर उपमहापौर यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या अनेक विजयी उमेदवारांच्या अर्जामध्ये त्रुटी असून देखील त्यांचे अर्ज वैद्य कसे ठरवण्यात आले असा प्रश्न देखील प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कुठलेही स्पष्टीकरण हे देण्यात आले नसल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहिती प्रजाशक्ती क्रांती दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करून बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी ही प्रजाशक्ती क्रांती दलाने केली आहे.

( नक्की वाचा : Nashik News : मराठी बोलण्यास शिक्षकाचा विरोध, मनसे कार्यकर्त्यांनी क्लासमध्ये केला राडा, पाहा काय घडले, VIDEO )

कानळदा ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाकडून मनमानी कारभार...

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील कानळदा ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून ग्रामपंचायतीच्या शेवटच्या वार्षिक सभेत ग्रामसेवकाने कोऱ्या प्रोसिडिंग बुक वर सह्या घेतल्याची तक्रारही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. 

Advertisement