Jalgaon Mumbai Flight: जळगावकरांसाठी Good News! मुंबई फक्त दीड तासांवर, दररोज विमान सेवा सुरु, वाचा वेळापत्रक

Jalgaon Mumbai Flight Timetable: मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन कंपनीने ही विमानसेवा दररोज (Daily) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Mumbai Flights News: जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून (Jalgaon Airport) आठवड्यातून काही दिवस असलेली मुंबई विमानसेवा (Mumbai Flight Service) आजपासून (रविवार, २६ ऑक्टोबर) दररोज सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना अवघ्या दीड तासात (1.5 Hours) जळगाववरून मुंबई गाठणे शक्य होणार आहे.

 यापूर्वी अलायन्स एअर (Alliance Air) कंपनीकडून जळगाव-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. मात्र, व्यावसायिक आणि वैयक्तिक कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन कंपनीने ही विमानसेवा दररोज (Daily) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Cyclone Montha : चक्रीवादळ मोंथामुळे कोणत्या राज्यात वादळाचे संकेत; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

मुंबईच्या सेवेसोबतच, गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद विमानसेवा (Ahmedabad Flight Service) देखील लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. या दोन्ही प्रमुख महानगरांची कनेक्टिव्हिटी (Connectivity) सुधारल्यामुळे जळगाव आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील काही भागातील नागरिकांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

जळगाव विमानतळाचे नवीन हिवाळी वेळापत्रक (Winter Schedule): जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या मार्गांसाठी एअरलाईन कंपन्यांनी नवीन हिवाळी वेळापत्रक जाहीर केले असून, वेळेत काही बदल करण्यात आले आहेत.

मुंबई-जळगाव-मुंबई (Mumbai–Jalgaon–Mumbai) वेळापत्रक

मंगळवार, गुरुवार आणि शनिवार: या दिवशी विमान रात्री ८:०० वाजता मुंबईहून जळगावात येईल आणि रात्री ८:३५ वाजता पुन्हा मुंबईकडे परतेल.

सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार: या दिवशी विमान दुपारी ४:२० वाजता मुंबईहून जळगावला येईल. त्यानंतर ४:४५ वाजता जळगावहून अहमदाबादसाठी रवाना होईल.

Advertisement

अहमदाबादहून परतीचे विमान: रात्री ८:०० वाजता जळगावात येईल आणि रात्री ८:२५ वाजता पुन्हा मुंबईकडे उड्डाण भरेल.

Maharashtra Rain : पुढील आठवड्यातही धो-धो; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

इतर मार्गांवरील वेळापत्रक:

  • गोवा–जळगाव: सोमवार ते रविवार (शनिवार वगळता),दु. १२:१० (गोवा),दु. १:५० (जळगाव)
  • गोवा–जळगाव: शनिवार,दु. २:३० (गोवा),सायं. ४:२० (जळगाव)
  • जळगाव–गोवा: सोम, मंगळ, गुरु, शुक्र, रवी",सायं. ५:३५ (जळगाव),सायं. ७:२० (गोवा)
  • जळगाव–गोवा: बुधवार,सायं. ६:०५ (जळगाव),रात्री ८:०५ (गोवा)
  • जळगाव–गोवा: शनिवार,रात्री ८:२५ (जळगाव),रात्री १०:२५ (गोवा)
  • जळगाव–पुणे: सोम ते रवी (शनिवार वगळता),दु. २:१० (जळगाव),दु. ३:३० (पुणे)
  • जळगाव–पुणे: शनिवार,सायं. ४:४० (जळगाव),सायं. ६:०० (पुणे)
  • पुणे–जळगाव: सोम ते रवी (शनिवार वगळता),दु. ३:५० (पुणे),सायं. ५:१५ (जळगाव)
  • पुणे–जळगाव: शनिवार,सायं. ७:०० (पुणे),रात्री ८:०५ (जळगाव)
  • जळगाव–हैदराबाद: दररोज,सायं. ६:२५ (जळगाव),रात्री ८:४५ (हैदराबाद)
  • हैदराबाद–जळगाव: दररोज,सायं. ४:२५ (हैदराबाद),सायं. ६:०५ (जळगाव)