Cyclone 'Montha' : बंगालच्या उपसागरावर मोंथा चक्रीवादळ (मोंथाचा अर्थ सुगंधित फूल) घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर मोंथा एक भयावह चक्रिवादळाचं रुप धारण करू शकतो. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेकडील तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने सरकत आहे. पुढे येथे भयंकर चक्रीवादळात रुपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र 26 ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात रूपांतरित होण्याची अपेक्षा आहे.
The depression over southeast Bay of Bengal moved nearly west-northwestwards with a speed of 8 kmph during past 6 hours and lay centred at 2330 hrs IST of yesterday, the 25th October 2025, over the same region, near latitude 11.0°N & longitude 87.7°E, about 550 km west of Port… pic.twitter.com/JjJJ6Iz15g
— India Meteorological Department (@Indiametdept) October 25, 2025
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.30 वाजता दक्षिण-पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा त्याच भागात केंद्रित होता. तो पुढे सरकत सरकत 26 ऑक्टोबरपर्यंत खोल कमी दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत दक्षिण-पश्चिम आणि जवळील पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रिवादळात परावर्तीत होण्याची शक्यता आहे. परिणामी 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत एक प्रचंड चक्रिवादळात परिवर्तित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रचंड मोठ्या चक्रिवादळाची शक्यता...
आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनमदरम्यान काकीनाडाजवळ 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी 110 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोंथा चक्रिवादळाबाबत सतर्क केला आहे.
रेड अलर्ट जारी...
हवामान विभागाकडून डॉ. मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबरला दक्षिण आणि किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या लेटेस्ट अपडेटनुसार, २६ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून २७ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत ओडिसाच्या किनाऱ्यावरील समुद्राची स्थिती अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world