Jalgaon News : जळगावात उमेदवाराची पळवा-पळवी, ठाकरे गट अन् स्वराज्य शक्ती सेनेमध्ये हाय होल्टेज ड्रामा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जळगावमध्ये रात्री हाय होल्टेज ड्रामा झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जळगावमध्ये रात्री हाय होल्टेज ड्रामा झाल्याचं समोर आलं आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार पार्वताबाई भिल यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना ठाकरे गटाने एबी फॉर्म जोडल्याचा आरोप स्वराज्य शक्ती सेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचा एबी फॉर्म जोडण्याचं लक्षात येताच उमेदवार पर्वताबाई भिल यांना शिवसेना ठाकरे गटाने पळवल्याचा आरोप स्वराज्य शक्ती सेनेकडून करण्यात आला आहे. 

उमेदवाराची पळवा पळवी...

त्यामुळे जळगावमध्ये उमेदवारांची पळवा पळवी सुरू असल्याचा काहीसा प्रकार समोर आला आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार पर्वताबाई भिल यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता. मात्र त्या उमेदवारी अर्जावर परस्पर शिवसेना ठाकरे गटाने आपला एबी फॉर्म जोडल्याचा आरोप स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आला असून हा प्रकार लक्षात आला. पर्वताबाई भिल यांना शिवसेना ठाकरे गटाने पळवल्याचा आरोपही स्वराज्य शक्ती सेनेने केला असून उमेदवारी अर्ज बदलणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी स्वराज्य शक्ती सेनेने केली आहे. 

नक्की वाचा - Nashik News : नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; एबी फॉर्मच्या वाहनाचा पाठलाग, इच्छुक उमेदवार नाराज 

पर्वताबाई भिल कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?

दरम्यान पर्वताबाई भिल या आमच्याच उमेदवार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला असून उमेदवारी पळवा पळवी करणारी टोळी सक्रिय असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी स्वराज्य शक्ती सीमेवर टीका केली आहे. याप्रकरणी पर्वताबाई भिल यांच्या उमेदवारी अर्जासोबत शिवसेना ठाकरे गट आणि स्वराज्य शक्ती सेनेचा एबी फॉर्म हा जोडलेला असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली असून छाननीनंतर कोणता एबी फॉर्म ग्राह्य धरला जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या संपूर्ण प्रकारानंतर उमेदवार पार्वताबाई भिल यांचा एक व्हिडिओ समोर आला असून यात भाजपने उमेदवारी डावल्याने शिवसेना ठाकरे गटातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं आहे. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत ठाकरे गटाकडून एबी फॉर्म न देण्यात आल्याने त्यांनी स्वराज्य शक्ती सेनेचा एबी फॉर्म स्वीकारत निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे जळगावमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. 

Advertisement