Jalgaon News: शिवसेना UBT नगराध्यक्षांची भाजप कार्यालयाला भेट, 'या' मंत्र्यासोबत बंद दाराआड केली एक तास चर्चा

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jalgaon Political News Today

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Jalgaon Political News Today : जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी अतुल पाटील यांनी जळगाव येथील भाजप कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.या भेटीदरम्यान छाया पाटील आणि अतुल पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क

त्यामुळे या चर्चेचा नेमका विषय काय होता? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.एकीकडे विधान परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असताना अशा परिस्थितीत ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..

छाया पाटील नेमकं काय म्हणाल्या?

शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा छाया पाटील यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट केले असून गिरीश महाजन यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध असल्याचेही म्हटले आहे. तसेच सदर भेट यावल येथील रुग्णालयाच्या कामासंदर्भात घेतल्याचे स्पष्टीकरण छाया पाटील यांनी दिले आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: टिटवाळ्यात घबराट,12 गुंडांचा 'त्या' चाळीवर सशस्त्र हल्ला, महिलांचे कपडे फाडून अत्याचाराचा प्रयत्न

निवडणुकीच्या ऐन वातावरणात झालेली ही भेट आणि त्यामध्ये झालेली तासभराची बंद दाराआड चर्चा यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.आगामी काळात या भेटीचे राजकीय पडसाद उमटतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.