जाहिरात

Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून तिच्या चार मुलांनाही विष पाजलं.

Raigad News: माणगावमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनं स्वत:ला संपवत चार मुलांनाही विष पाजलं, पुढे जे घडलं..
Raigad Mangoan Woman Suicide Case

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Raigad Mangaon Suicide Case : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून तिच्या चार मुलांनाही विष पाजलं. या महिलेनं स्वत: जीवन संपवलं आणि तिच्या मुलांनाही मारण्याचा प्रयत्न केला. यात त्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला असून इतर दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आशा जाधव (29), दुर्वा जाधव (7) आणि नंदिनी जाधव (4) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, खरवली आदिवासी वाडी येथील धर्मा जाधव यांची पत्नी आशा जाधवने 13 जून म्हणजेच आज शनिवारी सकाळी कोल्ड्रिंक्स मध्ये विष मिसळलं आणि ते स्वत: प्राशन केलं. तसच या महिलेनं तिची मुले रवी जाधव,दुर्वा  जाधव,नंदिनी जाधव,राजश्री जाधव विषारी द्रव्य पिण्यास दिलं. या घटनेत आशा जाधव,मुलगी दुर्वा जाधव,नंदिनी जाधव यांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा रवी जाधव (8) आणि मुलगी राजश्री जाधव (4) यांची परिस्थिती गंभीर आहे.

नक्की वाचा >> Pranit More 370 रुपये बिर्याणी प्रकरणावर मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर, 'ती' व्हायरल पोस्ट पाहून सर्वच थक्क

महिलेनं मासे मारण्याची गोळी कोंल्ड्रिक्समध्ये मिसळली अन्..

या घटनेच्या वेळी माणगाव येथील प्रसिद्ध बालरोग व नवजात शिशु स्पेशालिस्ट डॉ.आबासाहेब पाटणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात इन्फेक्शन झालेल्या मुलांची तपासणी करुन पुढील उपचारासाठी मुंबई कडे पाठविण्याचा सल्ला दिला.महिलेनं मासे मारण्याची गोळी (विष )थंड कोल्ड्रिंक्स मध्ये टाकून आशा जाधव स्वतः व मुलांना दिल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच ही घटना कौटुंबिक वादामुळे आलेल्या नैराश्यातून घडली असल्याचे देखील समजत आहे.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले असून पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com