मंगेश जोशी, जळगाव
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड काढल्याप्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही 3 आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेतील मुख्य संशयित अनिकेत भोई याला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटक केली होती. तर अन्य 3 संशयितांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फरार संशयीतांच्या शोधासाठी पोलिसांचे तीन पथक हे मध्य प्रदेशासह विदर्भ व मराठावाड्यात रवाना झाले होते. या पथकाच्या माध्यमातून फरार संशयितांचा कसून शोध सुरू आहे.
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरमी अनिकेत भोई , पियुष मोरे (महाजन), सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी चेतन भोई , सचिन पालवे या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित आरोपींमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्ता
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई,सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे. यातील पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना दिली आहे. तो नगरसेवकरही राहीला आहे. त्याने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्याला या प्रकरणात गोवले गेले आहे. ज्यावेळी जत्रेत गोंधळ झाला त्यावेळी सोडवण्यासाठी म्हणून तो तिथं गेला होता. त्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे असंही पाटील म्हणाले.