Jalgaon News: ठाकरे गटाच्या नेत्याने आयुष्य संपवलं, राजकीय वर्तुळात खळबळ

सदर घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी अनंत जोशी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव: जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

याबाबत सविस्तर बातमी अशी  की, जळगाव महापालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी अनंत जोशी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माजी नगरसेवक अनंत जोशी यांच्या आत्महत्येची बातमी कळताच महापालिकेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अनंत जोशी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दुसरीकडे, अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.  अमरावतीच्या शंकर नगर परिसरात दोन जणांनी निलेश भेंडेवर जीवघेणा हल्ला केला. निलेश भेंडे यांच्या छाती हात आणि पायामध्ये चाकूने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात निलेश भोंडवे हे जखमी झाले असून  सध्या रेडियंट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Advertisement