Jalgaon News: सेल्फी काढताना एक जण पाण्यात पडला, वाचवायला दोघे गेले, तिघांचा ही बुडून मृत्यू

या हृदयद्रावक घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

मंगेश जोशी 

सेल्फी काढणं तिन अल्पवयीन मुलांच्या जिवावर बेतलं आहे.  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात ही अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. चोपडा रोडवरील खदाणीत सेल्फी काढताना ही दुर्घटना घडली आहे. तिन मित्र खदाणीच्या इथं गेले होते. पावसामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे एकाने सेल्फी काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचा पाय घसरला आणि तो थेट खदानीच्या खोल पाण्यात पडला.  

आपाल मित्र पाण्यात पडला आहे. तो बुडत आहे. शिवाय तो वाचवण्यासाठी मदत मागत आहे, हे पाहाताच दुसऱ्या मित्रानेही खदानीत उडी मारली. त्या पाठोपाठ तिसऱ्या मुलाने ही उडी मारली. एकाला वाचवण्याच्या प्रयत्ना हे तिघे ही खोल पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे तिघे ही जवळपास 30 फूट खोल पाण्यात बुडाले. सेल्फी काढणे हे या तिघांच्या ही जीवावर बेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी मृत मुलांच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. 

Advertisement

नक्की वाचा - Kalyan News: खांद्यापर्यंत पाणी, चिमुकल्यासह 3 जण अडकले, पोलीस अधिकारी थेट पाण्यात उतरले अन्...

ज्या मुलांचा यात मृत्यू झाला त्यात मानव रत्नानी वय 14 वर्षे, कार्तिक उधनानी वय 14 वर्षे आणि दिनेश पंजवानी या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ते अमळनेरमधील सिंधी कॉलनीचे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव

पावसाळ्यात सध्या अनेक ठिकाणी पुरस्थिती आहे. काही ठिकाणी धबधबे ही प्रवाहीत झाले आहेत. नदी नाले तुबूंड भरून वाहत आहेत. अशा वेळी अनेक जण या ठिकाणी जात असतात. कोणी पर्यटनासाठी तर कुणी फक्त पाहण्यासाठी जातात. अशा स्थितीत घबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सेल्फीचा मोह टाळावा. शिवाय ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती आहे त्या ठिकाणी ही जाणं टाळा असं सांगण्यात आलं आहे. तरही या आवाहनाकडे बरेच लोक दुर्लक्ष करत आहेत. त्यातून अशा दुर्घटना होत आहेत.