5 hours ago

आगीच्या अफवेमुळे जळगावात पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 7 जणाची ओळख पटली आहे. आगीच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याने प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली. यात काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचे विक्रमी सामंजस्य करार मंजूर करण्यात आला असून तब्बल 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

Jan 23, 2025 22:28 (IST)

शाळा सुटल्याच्या वेळीच डोंबिवलीमध्ये झाड कोसळले, रिक्षा चालकाचा मृत्यू

डोबिंवलीमध्ये अतिधोकादायक झाड रिक्षावर कोसळल्यानं एका अतिधोकादायक झालेले झाड रिक्षावर कोसळल्याने एका रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. रामदीन लोद असे या रिक्षा चालकाचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. झाड कोसळण्याच्या वेळी शाळा सुटली होती. त्यामुळे या दुर्घटनेत काही पालकांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. 

Jan 23, 2025 20:46 (IST)

Live Update : गाव तिथं शिवसेना हे मिशन - एकनाथ शिंदे

पुढील वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे. बलशाली शिवसेना ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. तेच बाळासाहेबांचं खरं स्मारक ठरेल. शिवसैनिकाला काही अशक्य नाही, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत झालेल्या मेळाव्यात बोलत होते.

Jan 23, 2025 19:45 (IST)

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांना सुरूवात

 बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांना सुरूवात झाली आहे. बीकेसीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा तर अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.  

Jan 23, 2025 18:44 (IST)

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. पंतप्रधान,राष्ट्रपती व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 

Advertisement
Jan 23, 2025 18:41 (IST)

अमित शहा नाशिकच्या दौऱ्यावर

केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असून दुपारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाचे ते दर्शन घेतील.  त्यानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरु केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला ते भेट देणार असून तिथे विविध कार्यक्रम पार पडतील. शाह यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल  यांच्यासह ईतर काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Jan 23, 2025 17:01 (IST)

चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना कारावासाची शिक्षा

चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीन महिन्याची शिक्षा रामगोपाल वर्मा यांनी ही शिक्षा अंधेरी कोर्टाने सुनावली आहे. सात वर्षापुर्वीच्या चेक बाऊंस प्रकरणात वर्मा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात त्यांना तक्रारदाराला 3.72 लाख द्यावे. जर दिले नाही तर त्यांना अतिरिक्त 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल. 

Advertisement
Jan 23, 2025 15:13 (IST)

Live Update : मुंबईच्या ओशिवरा रयान ग्लोबल शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथक दाखल

मुंबईच्या ओशिवरा रयान ग्लोबल शाळेत बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉट पथक सध्या रयान ग्लोबल स्कूलमध्ये पोहोचले आहेत.

रयान ग्लोबल स्कूलच्या ईमेलवर धमकीची माहिती मिळाली आहे.

गेल्या अर्ध्या तासापासून बॉम्ब स्क्वाड डॉग स्कॉट आणि मुंबई पोलिसांचे पथक शाळेच्या आत बॉम्ब शोधण्याचे काम करत आहेत.

शाळेत बॉम्ब आहे की नाही हे तपासानंतर कळेल, असे बॉम्ब स्कॉटच्या पथकाने सांगितले आहे.

सध्या शाळेच्या आत बॉम्बचा शोध सुरू आहे.

Jan 23, 2025 15:08 (IST)

Live Update : पुणे बंगळुरू हायवेवर गॅस पाईप तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला मोठी आग

कऱ्हाडच्या हद्दीत पुणे बंगळुरु महामार्गावर गॅस पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याचं समोर आलं आहे. आज, गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास ही घटना घडली. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाले.

गोटे ता. कऱ्हाडच्या हद्दीत पुणे बंगळुरू हायवेवर गॅस पाईपचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पाईपलाईन ठेवलेले गोडाऊन आहे. या गोडाऊनला आज दुपारी अचानकच आग लागली. आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण अस्पष्ट आहे. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांचा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

Advertisement
Jan 23, 2025 15:05 (IST)

Live Update : स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; मंत्री भरत गोगावलेंचा टोला

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.  यावर मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावर टिका केली आहे. काही लोक जेवणाच्या ताटावरून उठून हात वाळण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात, असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावला आहे.  

हे आम्हाला निष्ठा शिकवत होते आता त्यांची निष्ठा समोर आल्याचं गोगावले म्हणाले. सध्या तरी आम्ही भाजप सोबत युती मध्ये आहोत, पुढच्या पावणे पाच वर्षात काय घडामोडी होतील सांगता येत नाही. परंतु जो पर्यंत आम्ही युती मध्ये आहोत तोपर्यंत आमच्याकडून काही चुकीचं होणार नाही असंही गोगावले यांनी स्पष्ट केलंय.

Jan 23, 2025 13:31 (IST)

Live Update : सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची 

नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेने हटवल्याने कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची

सोलापुरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना भाजप कार्यकर्त्यानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. मात्र सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावण्यात आले होते 

Jan 23, 2025 11:53 (IST)

Live Update : टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीची मुंबईत छापेमारी

टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीची मुंबईत छापेमारी 

मुंबई नवी मुंबई, विरार, कांदिवली, या ठिकाणी केली छापेमारी..

Ed ने टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात दाखल केलेला ईसीआर

दाखल ईसीआरअंतर्गत केली छापेमारी

Jan 23, 2025 11:28 (IST)

Live Update : गोव्यात विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी केली अटक

गोव्यात विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. पुणे बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ ही कारवाई केली आहे. त्याच्या चौकशीतून सातारा जिल्ह्यातील गांजा तस्करांच्या टोळीचा छडा लागला. पोलिसांनी टोळीकडून 91 किलो गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाइल असा 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली.

Jan 23, 2025 11:00 (IST)

Live Update : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर

Live Update : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर

Jan 23, 2025 10:04 (IST)

Live Update : राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. मात्र याच नाशिकमध्ये सध्या मनसेची घडी विस्कटलीय. एकीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले असतांनाच दुसरीकडे नाशिक मनसे मात्र दिवसेंदिवस बॅकफूटवर येत असल्याचे बघायला मिळते आहे. विधानसभा पक्ष निरीक्षकांसह स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गेल्या काही दिवसात अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असून आणखी काही पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर घसरलेलं इंजिन रुळावर आणण्यासाठी राज ठाकरे आजपासून दोन दिवस अचानक नाशिक दौऱ्यावर येत असून संघटनात्मक विभागनिहाय बैठक घेण्यासोबतच पदाधिकाऱ्यांशी ते संवादही साधणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा महत्वाचा आहे.

Jan 23, 2025 09:48 (IST)

Live Update : बारावी परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी नवे नियम

यंदा प्रथमच बारावीच्या वार्षिक परीक्षेदरम्यान कॉपी प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने नवा निर्णय घेतला आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आता संबंधित शाळेऐवजी इतर शाळांमध्ये करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शाळांसमोर उत्कृष्ट निकाल टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.शाळांच्या उत्कृष्ट निकालांसाठीचे आव्हान आणि परीक्षेची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाचा हा निर्णय महत्त्वाचा आहे.

Jan 23, 2025 09:37 (IST)

Live Update : मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी 

पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी फक्त निवडणुकीच्या तोंडावरच सक्रिय होतात

त्यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावं लागतंय 

आपण राजकीय पक्षावर पूर्णवेळ राजकारण केलं पाहिजे, जनतेत गेलं पाहिजे अशा शब्दात काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

30 जानेवारी रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात काल बैठक पार पडली या बैठकीत मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष उपस्थित होते

Jan 23, 2025 07:59 (IST)

Live Update : पुण्यात GBS रुग्णसंख्या 59 वर, आरोग्य विभागाची 2 लाख घरांमध्ये सर्वेक्षणाची तयारी

पुण्यात GBS रुग्णसंख्या 59 वर, आरोग्य विभागाची 2 लाख घरांमध्ये सर्वेक्षणाची तयारी

सिंहगड रस्त्यावरील पाण्यामुळे गिलन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या 59 वर पोहोचली असून, यामुळे राज्य आरोग्य विभागाने पुणे महानगरपालिकेला (PMC) 2 लाख घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्य तज्ञांचे मत आहे की दूषित पाण्यामुळे GBS चा प्रसार झाला असावा. गेल्या दोन आठवड्यांत सिंहगड रस्ता भागात या आजाराचे अनेक रुग्ण समोर आले आहेत.

Jan 23, 2025 07:56 (IST)

Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात कमालीची घट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात कमालीची घट पहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात सर्वत्र गारावा पसरलेला आहे. तर जिल्हात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे.

Jan 23, 2025 07:55 (IST)

Live Update : वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरू

वाल्मीक कराड याला रात्री 12 च्या सुमारास प्रकृती खराब झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले गेले

पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात केले दाखल

त्याआधी काल दुपारी देखील वाल्मीक कराड याची प्रकृती खराब झाली होती

आता कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत

Jan 23, 2025 07:53 (IST)

Live Update : वाल्मीक कराड यांच्या खंडणीतील जामीन प्रकरणी आज होणार केज न्यायालयात सुनावणी

खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वा ही सुनावणी होणार असून याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्याने व त्यानंतर विनंतीनुसार ही सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज ही सुनावणी केज न्यायालयात होणार आहे. या आधीच या जामीन अर्जावर आक्षेप घेत सीआयडीने कराडला जामीन देऊ नका असा अर्ज देखील न्यायालयात केला होता. आता यावर आज कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि जामीन अर्जावर न्यायालय काय सुनावणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Jan 23, 2025 07:18 (IST)

Live Update : लासलगाव बाजार समितीत वर्षभरात 1135 कोटी 48 लाख रुपयांची उलाढाल..

आशिया खंडातील कांद्याचीअग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी कांद्याच्या खरेदी -. विक्रीच्या व्यवहारातून सुमारे  1135 कोटी 48 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 55 लाख 71 हजार क्विंटल कांदा लासलगाव मुख्य बाजार आवार यासह उपबाजार विंचूर, निफाड येथे विक्रीसाठी आणला होतो असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे सांगत आहे.