लक्ष्मण साळुंके, प्रतिनिधी
Jalna BJP MLA Narayan Kuche : जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी एका बँक मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ललित शिर्लेकर असं या बँक मॅनेजरचं नाव आहे.या फोनवरील कथित संवादाची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार कुचे यांनी एका शेतकऱ्याचे थकीत कर्ज प्रकरण निकाली काढण्यासाठी बँक मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
नेमके प्रकरण काय?
जालना जिल्ह्यातील जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजरला आमदार नारायण कुचे या भाजपच्या आमदारांनी फोन केला. एका शेतकऱ्याच्या थकीत कर्ज प्रकरणात त्यांनी बँक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Malegaon Sugar Factory Election Result : शरद पवारांचा अजित पवारांना टोला, 40 वर्षांचा इतिहास सांगितला )
या संभाषणाची क्लिप गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होत आहे . ' तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय . एवढा माज .. एफडी वाल्याला त्रास ..ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा ' मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं . नाही ऐकलं तर हाताने समजावून सांगतो अशी धमकीही कुचे यांनी युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना दिली.