Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार

रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके,  जालना: जालन्यात काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष  माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते, माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या नेत्याने यांनी रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का असणार आहे.

OBC Mandal Yatra: ओबीसींच्या जागरासाठी 'मंडल यात्रा', भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची फिल्डिंग

जालन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिका निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे माजी मंत्री  भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या नेत्याने आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची ही माहिती अधिकृत खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. या बैठकीत त्यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

पुढच्या आठवड्यात मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश करणार असल्याचेही ठरले असून भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेवर घेण्यात येईल अशी चर्चा अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकांआधी महाविकास आघाडीतील माजी मंत्री भाजपात आल्यास जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. 

Congress News : काँग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात; शरद पवारांना धक्का

Topics mentioned in this article