Jijamata Jayanti: जिजाऊंचं माहेर अन् छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ, सिंदखेडराजाची काय आहे स्थिती?

राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विकास आराखडा घोषित करते, मात्र कुठलाच विकास होत नाही असा आरोप शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासक करत आहेत.

जाहिरात
Read Time: 4 mins

अमोल गावंडे,बुलढाणा 

सिंदखेडराजा हे राजामात जिजाऊंचं माहेर. त्यांची आज 427 वी जयंती साजरी होत आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या त्या कन्या. लखुजीरावांच्या राजवाड्यात जिजाऊंचा जन्म झाला. मात्र या राजवाड्यासह सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक 22 तलाव, बारव व ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व ऐतिहासिक वास्तू केंद्र व राज्य पुरातत्व विभागाच्या सध्या ताब्यात आहेत. त्या सर्व वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली. मात्र अजून सरकारने लक्ष दिलेलं नाही असा स्थानिक आरोप करतात. राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विकास आराखडा घोषित करते, मात्र  कुठलाच विकास होत नाही असा आरोप शीवप्रेमी आणि इतिहास अभ्यासक करत आहेत. जिजाऊंच्या जयंती निमित्ताने ऐतिहासिक सिंदखेडराजाची स्थिती काय आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजमाता जिजाऊ यांचा जन्म जानेवारी 12 इ.स. 1598 रोजी  सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जात आहे. जिजाऊंचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये झाला.आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागून आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बाग देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ ही आहे.  ज्या महालात जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती. येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर ही आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Fraud News: 'टोरेस'नंतर आणखी एका स्कॅमने मुंबईत खळबळ! गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना, प्रकरण काय?

या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे. तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख ही इथं कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोणी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर 8 व्या ते 10 व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर ही याच राजवाड्यात आहे. राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्ल्याच्या निर्मितीची सुरूवात झाली होती. त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती 20 फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा 40 फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो. त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'मला माझ्या पत्नीला न्याहाळायला आवडतं'; 70 तासांच्या कामावरील आनंद महिंद्रांच्या विधानानं जिंकली मनं!

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना इथचं पाहायला मिळतो. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला आहे. विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ इथं आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती आहे. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होता. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -सोलापूर-धाराशिव जिल्ह्यात दिसलेल्या त्या वाघाला जेरबंद करण्याचे वन विभागाचे आदेश

 या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे. हे ऐतिहासिक, पर्यटनस्थळ म्हणून सुद्धा जगभर प्रसिद्ध झाले आहे. जगभरातून हजारो लोक सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात. राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला राजवाडा, रंगमहाल, काळाकोट, लखुजीराजे समाधी, मोती तलाव, चांदणी तलाव, पुतळा बारव, सजना बारव, बाळसमुद्र, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, सावकार वाडा यासह अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळत आहे. मात्र त्याची हवी तशी काळजी आज घेतली जात नाही असा आरोप शिवप्रेमींचा आहे. हा ऐतिहासिक वारसा जपला पाहीजे असं त्याचं म्हणणं आहे. केवळ जयंती निमित्ताने या वास्तूकडे पाहून नका. तो एक ठेवा आहे असंही इतिहास प्रेम म्हणतात. सरकारने हा ठेवा तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपावा अशी मागणी आता होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Bird Sanctuary : देशी-विदेशी जातीचे तब्बल 30 हजार पक्षी नांदुरमधमेश्वरमध्ये दाखल, पर्यटकांची मोठी गर्दी

बुलढाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचे जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे उद्या 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचा 427 वा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यासाठी मराठा सेवा संघाकडून जिजाऊ सृष्टीवर जय्यत तयारी करण्यात येत असून अंतिम टप्प्यात आहे. तर उद्या राज्यातील लाखो जिजाऊ भक्त मॉ जिजाऊ यांना नतमस्तक होण्यासाठी सिंदखेडराजा येथे येणार आहेत. त्यामुळे येथे मॉ जिजाऊ भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत असते. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिस दलाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त लावला आहे. तर आजपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी होणार आहे.