मुंबई: राजकीय वर्तुळात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसत असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या पराभवानंतर ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते पक्ष सोडत असून महाराष्ट्रभर उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुवत होताना दिसत आहे. अशातच सोमवारी मुंबईमध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी पक्षाला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेनेतील फुटीनंतर आणि उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर मातोश्रीवर पहिल्यांदा घेऊन जाणारे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. मात्र शिवसेना नेते अनिल परब, संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर आज जितेंद्र जानावळे यांना समजूत काढण्यासाठी मातोश्रीवर बोलावण्यात आले होते.
उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर संवाद साधत त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले तसेच विलेपार्लेमध्ये मला निवडणूक लढवायची होती, मात्र सहा वर्ष मला विधानसभेबाहेर ठेवलं, असे गंभीर आरोपही त्यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निघाल्यानंतर त्यांनी केलेली एक कृती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन बाहेर आल्या ंतर जितेंद्र जानावळे यांनी मातोश्रीच्या गेटवर डोके ठेऊन नमस्कार केला. मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये जाताना आणि मंदिराबाहेर येताना माणूस उंबऱ्यावर झुकतो. आज मी त्याठिकाणी पाया पडलो, काय समजायचं ते समजून घ्या. असं जितेंद्र जानावळे म्हणाले.