कोल्हापुरातील दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थान चार दिवस देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 7 जुलै ते 11 जुलै दरम्यान मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येणार नाही. याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली आहे. दरम्यानच्या कालावधीत कासव चौकातून उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्या वतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचे संवर्धन 7 ते 11 जुलै 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना मुर्तीचे दर्शन घेता येणार नाही. या कालावधीमध्ये भाविकांना उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'
जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागास कळविले होते. पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली आहे. मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांनी अहवाल दिला असून या नुसार मुर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world