
मनोज सातवी, मुंबई: दोन दिवसांपूर्वी वसई विरार, नालासोपारा आणि हैदराबाद मधील १३ ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये वसई विरार महापालिकेचे नगर रचना उप संचालक Y.S. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी मोठे घबाड सापडले होते. यावेळी रेड्डी यांच्या घरातून सुमारे 8.6 कोटी रोख रक्कम आणि २३ कोटी रुपये किंमतीचे हिरेजडित दागिने जप्त करण्यात आले होते. यावरुनच आता गंभीर आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतीच्या बांधकाम गैरव्यवहारा प्रकरणी ED ने (अंमलबजावणी संचलनालय) नालासोपारा, वसई, विरार आणि हैद्राबाद येथील 13 ठीकाणी छापेमारी केली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. वसई विरार महापालिकेचे नगर रचना उपसंचालक Y.S. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या छाप्यात सुमारे 8.6 कोटी रोख रक्कम आणि २३ कोटीरुपये किंमतीच्या हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
परंतु Y.S. रेड्डी हे एक छोटा प्यादा असून यापेक्षाही मोठे मासे (अधिकारी आणि राजकारणी) या भ्रष्टाचारात अडकले असल्याचा आरोप, करत त्यांचे अनधिकृत बांधकामांचे रेट कार्ड आगरी सेनेचे नेते कैलास पाटील यांनी गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.
( नक्की वाचा : India Tour of England : विराट-रोहितशिवाय कशी असेल टीम इंडिया? 'या' 17 जणांची होऊ शकते इंग्लंड दौऱ्यासाठी निवड )
अधिकारांचे अनधिकृत बांधकाम संदर्भात square feet मागे रेटकार्ड
1) नगर रचना विभाग: 12 ते 15 रुपये/फुट
(उप संचालक, Y.S. रेड्डी )
2) पालिका आयुक्त: 35 रुपये /फुट
3) प्रस्थापित राजकारणी : 300 रुपये /फुट
4) महापालिकेच्या 550 आणि 450 कोटींच्या मुदत ठेवी (FD) मोडल्या असल्याचा आरोप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world