Nashik Accident: सुसाट कार थेट बंगल्यात... 5 जणांचा जागीच मृत्यू; नाशिकमध्ये हळहळ

Nashik Accident News: अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Accident: नाशिकमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कळवण - नाशिक मार्गावर एक भरधाव कार भेट बंगल्यात घुसल्याने भयंकर दुर्घटना घडली. या अपघातात पाच जण ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही भयंकर दुर्घटना घडली. मृतांमध्ये चालकासह चार महिलांचा समावेश आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळवण - नाशिक मार्गावरील कोल्हापूर फाटा येथे बुधवार रात्री 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात भरधाव वेगात असलेली कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात शिरली. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

लग्न समारंभासाठी गेलेले नामपूर येथील भदान कुटुंबीय कार्यक्रम आटोपून सटाणा येथे परतत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात शैला वसंत भदाण (वय, 62), सरला भालचंद्र भदाण (वय,50), चालक खालिक मेहमूद पठाण (वय,50)  माधवी मेतकर (32) त्रिवेणी मेतकर (4) सर्व रा. देवळा हे जागीच ठार झाले. तर भालचंद्र भदाण (52) रा. नामपूर आणि उत्कर्ष मेतकर (12) रा. देवळा हे गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News: पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली, 30 प्रवासी गंभीर जखमी, चालकाला डुलकी लागल्याने..

दरम्यान, आज पहाटे सोलापूर पुणे महामार्गावरही भीषण अपघाताची घटना घडली. चालकाची झोप लागल्याने भरधाव ट्रॅव्हल्स उलटून ही दुर्घटना झाली. यामध्ये पुण्यासह मराठवाड्यातील 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Advertisement