KDMC Election 2026: पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी

भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार  राडा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, डोंबिवली:

Kalyan Dombivli Election 2026: राज्याच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून दोन दिवसांनी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे, अशातच डोंबिवलीमध्ये भाजप-शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे.

भाजप- शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये निवडणूक लढत आहे. मात्र  डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये युती नाही. कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले  आहेत. रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने केला होता.

'मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, पण तुमचं राजकारण धोक्यात' शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला

भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करतानारंगेहात पकडल्याचा आरोप देखील केला आला. या कारणावरून जोरदार राडा झाला. त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकारामनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार  राडा झाला.

दोघे जखमी..

या राड्यामध्ये भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर  जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील  जखमी  असल्याची माहिती आहे. ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.

Advertisement

'जागा वाटपासाठी नाही, शिवसेना-मनसेची युती ही फक्त..', ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी Inside Story सांगितली