अनिल देशमुखांनंतर ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवर हल्ला; लेक कारमध्ये असताना साधला निशाणा

उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील उबाठा गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाला काही तास शिल्लक असताना राज्यातून मारहाणीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मारहाण आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केलीय. या दगडफेकीमध्ये देशमुख जखमी झाले आहेत. त्यानंतर कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पूर्व मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला आणि दगडफेक करण्यात आल्याचं उघड झालं आहे. मध्यरात्री उशीरा त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी बोडारे यांची मुलगीसुद्धा एका गाडीत होती. 

नक्की वाचा - राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार?  पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश 

उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण पूर्व मतदारसंघातील उबाठा गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा एका गाडीत होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत होता, बोडारे यांची मुलगी आणि काही महिला तसेच काही कार्यकर्ते दोन गाड्यांमधून कॅम्प क्रमांक चार येथील ओटी सेक्शन येथून जात होते.

काही अज्ञात व्यक्तींनी या गाड्यांवर हल्ला करून दगडफेक केली, या घटनेत एका गाडीचे नुकसान झाले असून,रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे पोलीस स्टेशनमध्ये  सदरची तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते. या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे.

Advertisement