पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण ताजं असताना कल्याणमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केडीएमसीच्या (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयात शांतीदेवी मोरया या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीदेवी या महिलेला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीची औषधंही त्यांना देण्यात आली होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर या महिलेला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार होते. यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. केडीएमसी हद्दीत महापालिकेच्या तीन प्रसुतीगृहाची रुग्णालयं आहेत. त्यातील एकाही रुग्णालयात आयसीयूची व्यवस्था नाही, अशी माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे.