Kalyan News: ना दरवाजे, सुरक्षा.. शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

धक्कादायक म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, अंबरनाथ: अंबरनाथच्या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडली, त्यातील एक गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना घडून आठवडाही उलटलेला नाही, तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा, किंबहुना त्याहून अधिक धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात एका शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. त्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत.

(नक्की वाचा:  Pune Job Fair: नोकरीची मोठी संधी, पुण्यात 2 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी रोजगार मेळावा)

जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला, तर ही निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.अंबरनाथच्या घटनेनंतर कल्याण आरटीओने तिथे केवळ काही शाळांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकली. प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई  यापैकी काहीच झाले नाही.

 आरटीओ कार्यालयाच्या अवघ्या ५ किलोमीटर परिसरातून विद्यार्थी एका टेम्पोमधून अशा जीवघेण्या पद्धतीने नेले जात आहेत आणि तरीही आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन पडलेले नाही. या यंत्रणेला पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग सापडला आहे. अपघात झाल्यावरच तुम्हाला जाग येणार का? मुलांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? ही निष्क्रियता आणखी किती बळी घेणार आहे? असे प्रश्न आता सर्व सामान्यांकडून उपस्थित केले जात आहे.

Pune Crime : पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास

Topics mentioned in this article