Kalyan Shivsena VS BJP Dispute: कल्याण पूर्वेत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कल्याणमध्ये शिवसेना- भाजप समर्थकांमध्ये राडा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीला जवळपास सात महिने उलटले असले, तरी निवडणुकीतील जुने वाद अद्यापही कायम असल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात भाजपचे माजी उपमहापौर विकी तरे यांचे समर्थक आकाश जयस्वाल आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे.
Beed FDA Raid: पनीर, खवा नव्हे विष खाताय! FDA च्या धडक कारवाईने राज्यात खळबळ; तुम्हीही व्हा अलर्ट
निवडणुकीत विकी तरे यांचा मधुर मात्रे यांनी पराभव केला होता मधुर म्हात्रे ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आले होते नंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मधुर मात्रे यांच्या तक्रारीनुसार, आकाश जयस्वाल याने नगरसेवक मधुर म्हात्रे यांना धमकी दिली, परिसरात दिसला तर तुला मारून टाकणार या शब्दात धमकावले तसेच त्यांचे बंधू निलेश म्हात्रे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून दागिने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे, भाजपचे माजी उपमहापौर विकी तरे यांचे समर्थक आकाश जयस्वाल याने दाखल केलेल्या तक्रारीत नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्यावर मोबाईल हिसकावून घेतल्याचा, तसेच निलेश म्हात्रे अमित राय सौरभ मिश्रा आणि राम घोरी त्यांच्यावर आकाश जयस्वाल यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे कल्याण पूर्वेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीतील दोन घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येच संघर्ष झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे.
Mumbai Rain LIVE: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! वाहतुकीवर मोठा परिणाम; वाचा LIVE अपडेट