Kalyan Railway Station Traffic Changes SATIS Project News: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीतून (Chronic Traffic Congestion) कल्याणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम' (SATIS - सॅटिस) अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या तीन उड्डाणपुलांपैकी सर्वात मोठा 'उड्डाणपूल अ' (Flyover A) हा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाची किंमत किती? कधी होणार सुरु?
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात वर्दळीच्या वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या कल्याण स्टेशन परिसराची कोंडी दूर करण्याचा उद्देश असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च कायदेशीर वादामुळे वाढला आहे. सुरुवातीला 498 कोटींचा असलेला हा प्रकल्प आता 602 कोटींवर पोहोचला आहे. जानेवारी २०२१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र बाधित इमारतींचे रहिवासी आणि हॉटेल मालकांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर वादामुळे याला विलंब झाला. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी केडीएमसीने (KDMC) रेल्वेकडून ३५ वर्षांसाठी ४९१ चौरस मीटर जागा भाड्याने घेतली आणि रस्त्यांचे रुंदीकरणही केले आहे.
PM मोदींच्या दौऱ्यानिमित्त मोठे बदल! नवी मुंबईत 'या' वाहनांना नो एन्ट्री; जाणून घ्या वेळ आणि मार्ग
उड्डाणपूल 'अ' चेही काम वेगाने सुरु:
'उड्डाणपूल अ' हा या प्रकल्पातील सर्वात मोठा पूल असून, त्याची लांबी १.१२ किलोमीटर आहे. हा पूल सुभाष चौक ते बेल बाजार (Bail Bazaar) दरम्यान असून, रेल्वे स्थानक परिसरातून जातो. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ९३० मीटर काम पूर्ण झाले आहे. केडीएमसीच्या 'स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या वतीने हे काम वेगाने सुरू आहे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करून नवीन वर्षाच्या आसपास हा पूल खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
इतर उड्डाणपुले कधी होणार सुरु?
'उड्डाणपूल अ' सोबतच 'उड्डाणपूल क' (Flyover C) आणि 'उड्डाणपूल ड' (Flyover D) या दोन्ही पुलांचे कामही ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. प्रकल्प प्रभारी रोहिणी लोकारे यांनी सांगितले की, 'उड्डाणपूल क' (२०६ मीटर लांबीपैकी १८१ मीटर) आणि 'उड्डाणपूल ड' (२९७ मीटर लांबीपैकी २३५ मीटर) पूर्ण झाले आहेत. हे तिन्ही उड्डाणपूल एकमेकांशी जोडलेले असतील आणि मार्च २०२६ पर्यंत 'क' आणि 'ड' पूल सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
त्याच वेळी एसटी डेपोचे प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळा (Workshop) देखील तयार होतील. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्याचे आणि 'उड्डाणपूल अ' चे काम रात्रंदिवस सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.