मुंबई: मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी ‘कमवा आणि शिका' योजना योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या पैशामधून मुलींना दैनंदिन खर्चासह शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे.
विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून दर महिना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. या पैशामुळे विद्यार्थिनींना राहण्याची सोय तसेच जेवणाची सोय करता येईल. त्यासोबतच त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे. त्यासाठीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कमवा आणि शिका योजना आणण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.
FASTag Annual Pass : FASTag च्या वार्षिक पासची धूम, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक एन्ट्री
ही योजना कशी राबवायची? याबाबत आराखडा तयार करणे सुरु आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालये त्यांच्याकडील विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच या विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवली जाईल. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थिनी काम करत आहेत, त्यांच्या खात्यात महिन्याला दोन हजार रुपये जमा होतील या योजनेचा लाभ पाच लाख विद्यार्थिनींना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दरमहा १०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असंही चंद्रकात पाटील यांनी सांगितला आहे.
नक्की वाचा - Bank Minimum Balance : मिनिमम बॅलेन्ससाठी कोणत्या बँकेकडून किती चार्ज? कुठे फ्री, पाहा पूर्ण यादी