अलमट्टीबाबत कर्नाटकचा मोठा निर्णय! कोल्हापूर, सांगलीचा धोका वाढला; पुन्हा संघर्ष पेटणार?

सध्याच्या ५१९ मीटर उंचीवर असलेल्या आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रावरही मोठा परिणाम होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी:  कर्नाटका सरकारने आलमट्टी धरणाबाबत एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या ५१९ मीटर उंचीवर असलेल्या आलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रावरही मोठा परिणाम होणार आहे. 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी  (१६ डिसेंबर २०२४) पत्रकार परिषदेत आलमट्टी धरणाच्या उंचीला वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कृष्णा नदीवरील जलसंपदेला अधिक कार्यक्षमतेने वापरण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. शिवकुमार यांनी सांगितले की, यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि कृषी, पाणीपुरवठा आणि वीज उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्नाटक सरकारने हे कार्य लवकरच सुरू करणार असून, पर्यावरणीय मंजुरीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र याचे मोठे आणि धोकादायक परिणाम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सिमेवरील भागांवर होणार आहेत. 

महाराष्ट्राची चिंता वाढण्याची कारणे:
    •   कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये महापुराचा धोका वाढण्याची भीती
    •   कृष्णा, पंचगंगा, कोयना, वारणा आणि दुधगंगा नद्यांवर परिणाम होण्याची शक्यता
    •    स्थानिक लोकप्रतिनिधी व संघटनांकडून तीव्र विरोध

Advertisement

   ऐतिहासिक पार्श्वभूमी:
    •    कृष्णा पाणी वाटप लवाद-2 कडून धरणाची उंची वाढविण्यास परवानगी
    •    मागील वर्षांत 2005, 2019, 2021 मध्ये मोठे पूर आले होते

स्थानिक लोकांची भीती:

  •  गावांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शंका
  • शेती आणि जीवनमान प्रभावित होण्याची चिंता
  • रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी
  • या निर्णयामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे

(नक्की वाचा: Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे)