VIDEO: पैलवान सोनाली महाडिकची कुस्ती सोडण्याची घोषणा? प्रायोजकांवर आरोप, रडत रडत म्हणाली...

Sonali Mahadik Viral Video: सोशल मीडियावर भावुक व्हिडिओ पोस्ट करत सोनालीने मैदान सोडत असल्याचे सांगितले. यावेळी तिने प्रायोजकांवर गंभीर आरोप केलेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sonali Mahadik Kusti Retirement:  कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना आस्मान दाखवणारी 'खेलो इंडिया' स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पैलवान सोनाली महाडिक हिने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने खळबळ उडाली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र न ठरल्याने निराश झाल्यानंतर तिने हा निर्णय जाहीर केला होता, मात्र आता तिने आपला हा निर्णय बदलला असून पुन्हा नव्याने तयारी सुरु करणार असल्याचे म्हटलं आहे.

MS Dhoni: CSKच्या करोडो चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनी IPL मधून आऊट; 'इतके' आठवडे संघाबाहेर

नेमकं काय घडलं? 

निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीने संस्थापिका स्वाती अळळीमोरे - साखरे यांनी सोलापुर येथे आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पैलवान सोनाली महाडिक हिचा पराभव झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोनालीचा पैलवान अपेक्षा पाटीलने पराभव केला. या पराभवानंतर सोनालीने भावुक व्हिडिओ पोस्ट करत आयोजकांवर गंभीर आरोप केले. तसेच कुस्ती सोडत असल्याचा निर्णयही जाहीर केला होता. 

Advertisement

"मी सर्वांची माफी मागते, तुमच्या सर्वांची अपेक्षा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं, मलाही महाराष्ट्र केसरी व्हायचं होते. मलाही ती गाडी मिळवायची होती.दोन दिवसांपर्यंत माझे वजन ६०-६१ भरत होते. शेवटी माझे २०० ग्रॅम पण वाढत नव्हते, कसंबसं माझे ६५ वजन भरले.  २८ फेब्रुवारीला माझ्या मनगटाला लागलं. तेव्हापासून मी हाताची काहीही प्रॅक्टिस केली नाही, त्यानंतर मला पायालाही लागले," असं सोनाली म्हणाली होती.

प्रायोजकांवर गंभीर आरोप

"मला माहित होते दोन महिन्यांनी  महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, मी मैदान खेळायला नको होते, कारण मैदानात दुखापत झाली. मात्र खर्च करण्यासाठी पैसे नव्हते, पैशासाठी मी मैदाने खेळले. आता मी या व्हिडिओमध्ये कुणाचे नाव घेत नाही, पण मला कोणीही स्पॉन्सर मिळाला नाही, बरेच जण म्हणत होते स्पॉन्सर करणार, सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला सांगितले. मात्र कोणीही स्पॉन्सर मिळाला नाही. मला कोणी एक रुपयाही देत नाही. माझा सर्व खर्च मी माझ्या कुस्तीमधून करत होते, असा आरोपही तिने यावेळी केला होता.

निर्णय मागे!

दरम्यान, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. सोनाली महाडिकच्या निर्णयाने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र तिने हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले आहे. काल मी भावनेच्या भरात बोलून गेले. तुमच्या अपेक्षा पूर्ण करु न शकल्याने मी हा निर्णय घेतला होता.मात्र मला माझी आई बाबा, सरांनी समजावून सांगितले. मी सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यामुळे मी आता कुस्ती सोडणार नाही. असाच पाठिंबा राहू द्या, असं तिने स्पष्ट केले आहे. 

IPL 19: खेळाडूंच्या 'मनमर्जी'ला लगाम! BCCI कडून नियमात मोठे बदल; उल्लंघन केल्यास दंडही