जाहिरात

MS Dhoni: CSKच्या करोडो चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनी IPL मधून आऊट; 'इतके' आठवडे संघाबाहेर

दुखापतीमुळे धोनीला दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या बातमीने सीएसकेच्या करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

MS Dhoni: CSKच्या करोडो चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनी IPL मधून आऊट; 'इतके' आठवडे संघाबाहेर

MS Dhoni ruled out From IPL:  आजपासून इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. त्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार, स्टार खेळाडू महेद्रसिंह धोनी आयपीएलचे पहिले दोन आठवडे बाहेर राहणार आहे. दुखापतीमुळे धोनीला दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या बातमीने सीएसकेच्या करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

चेन्नईचा 'सुपर किंग' IPLमधून आऊट! 

आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून एक वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा आधारस्तंभ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दुखापत झाली असून, तो स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांना मुकण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीने शनिवारी अधिकृत निवेदनातून ही माहिती दिली असून धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या रणनीतीत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

IPL 19: खेळाडूंच्या 'मनमर्जी'ला लगाम! BCCI कडून नियमात मोठे बदल; उल्लंघन केल्यास दंडही

​नेमकी दुखापत काय?

​चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या पायाच्या स्नायूला (Calf Strain) दुखापत झाली आहे. सध्या तो पुनर्वसनाच्या (Rehabilitation) प्रक्रियेतून जात आहे. "MS धोनी सध्या दुखापतीतून सावरत आहे. यामुळे तो टाटा आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांत खेळू शकणार नाही. 'थाला' लवकर बरा हो," अशा शब्दांत सीएसकेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोमवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईचा पहिला सामना होणार आहे, मात्र या सामन्यात धोनी मैदानावर दिसणार नाही.

RCB Name Change: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं नाव बदलणार? नव्या मालकांनी काय सांगितलं?

​संजू सॅमसनकडे मोठी जबाबदारी

धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाकडे असेल, याची चर्चा आता रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आता यष्टीरक्षणाचे हातमोजे चढवणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावापूर्वी चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड केले होते. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून सॅमसनकडे पाहिले जात असून, आता त्याच्यासाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com