जाहिरात

Viral News: माणुसकी जपणारी मुंबई! सायन स्टेशनवरील मध्यरात्र, तो एकटा अन्... तरुणाने सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

Young Man Viral Post On Mumbai: तरुणाने दाखवलेल्या माणुसकीने बेंगळुरुमधील तरुण भावुक झाला, म्हणूनच मला मुंबई आवडते म्हणून त्यानं भरभरुन कौतुक केले.

Viral News: माणुसकी जपणारी मुंबई! सायन स्टेशनवरील मध्यरात्र, तो एकटा अन्... तरुणाने सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

Mumbai Midnight Experience Viral Post: मुंबई म्हणजे महाराष्ट्राची शान. देशाच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक मायानगरी मुंबईमध्ये गुण्या गोविंदाने राहतात. मुंबईकरांच्या माणुसकीची, त्यांच्या आपुलकीची नेहमीच चर्चा होते. म्हणूनच या शहराला माणुसकी जपणारी 'आपली मुंबई' म्हणतात. मुंबईकरांच्या माणुसकीचा असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मध्यरात्रीची वेळ अन् माणुसकीचे दर्शन...

 एका बेंगळुरुच्या तरुणाला मुंबईमध्ये आलेला सुखद अनुभव त्याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रात्री उशिरा रिक्षा मिळत नसल्याने त्याची सुरु असलेली धडपड, बस पकडण्याची भिती अन् अशावेळी धावून आलेला एक तरुण.. याचा एक सुंदर किस्सा त्याने सांगितला आहे. तरुणाने दाखवलेल्या माणुसकीने बेंगळुरुमधील तरुण भावुक झाला, म्हणूनच मला मुंबई आवडते म्हणून त्यानं भरभरुन कौतुक केले.

Central Railway Block: लक्ष द्या! मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर 3 दिवस खोळंबा! डेक्कन क्वीनसह 17 एक्स्प्रेस रद्द

मुंबईमध्ये आल्यावर माणुसकी जिवंत आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो. असाच सुंदर क्षण मी अनुभवला. मी रात्री उशिरा सायन स्टेशनवर उतरलो, माझ्या हातात दोन जड बॅगा होत्या, मी थकलो होतो. मला सायन सर्कल येथून बंगळुरुला जाणारी बस पकडायची होती, ज्यासाठी मी रिक्षा शोधत होतो. मात्र रात्रीची वेळ असल्याने हात करुनही एकही रिक्षाचालक थांबत नव्हता.

अशातच एक बाईकस्वार तरुणाने माझ्या जवळ आल्यावर येऊन गाडीचा वेग कमी करत मला लिफ्ट पाहिजे का? असं विचारले. त्याने मला कुठे जायचे आहे, याची चौकशीही केली नाही. मी मला बस पकडायची आहे असे सांगत त्याच्या बाईकवर बसलो. त्याने मला अगदी माझ्या स्पॉटवर सोडले. तुम्ही इथे थांबा, तुमची बस येईल असं त्याने सांगितले. 

नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया..

सर्वात विशेष म्हणजे  मला सोडताना मला कळले की तो प्रत्यक्षात रॅपिडो कॅप्टन आहे. त्याच्या फोनवर मी बुकिंगही पाहिले. आम्ही दोघे एकमेकांना ओळखतही नव्हतो. मात्र त्याने दाखवलेल्या माणुसकीने माझी रात्र खरोखर बदलून टाकली. अशा क्षणांमुळेच मी मुंबईवर प्रेम करतो, असं या तरुणाने सांगितले आहे. तरुणाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com