India Pakistan Tension: जवान सुट्टीला आला पण 24 तासाच्या आता सीमेवर रवाना झाला, गावकऱ्यांनी काय केलं?

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करुन पर्यटकांची हत्या केली. या घटनेचे प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नंदूरबार:

प्रशांत जव्हेरी 

केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने भावाच्या लग्नासाठी सुट्टी काढली. तो गावाकडे आला मात्र अचानक सुट्टी रद्द झाल्याचा फोन आल्याने लग्न सोडून भारत मातेच्या रक्षणासाठी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी रवाना झाला. लग्नाला चार दिवस बाकी असताना सुट्टीवर आलेला जवान अवघ्या 24 तास ही गावात थांबला नाही. भावाच्या लग्नापेक्षा देश सेवेला प्राधान्य देणाऱ्या जवानाचे डीजेच्या मिरवणुकीत माळीवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून रवाना केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किशोर भगवान माळी हा केंद्रीय सुरक्षा दलात आहे. त्यांचा काकांचा मुलगा प्रकाश श्रावण माळी याचे 14 तारखेला लग्न होते. त्यामुळे किशोर माळी हा जवान लग्नासाठी सुट्टी घेऊन रात्री उशिराने नंदुरबार येथे दाखल झाला. भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांना तात्काळ सैन्य दलाने बोलविले. भावाच्या लग्ना अगोदरच सैन्यदलाने बोलवताच त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत जवान किशोर माळी हे भारत देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर रात्री लगेच रवाना झाले. घरात लग्नाचे वातावरण सुरू असताना लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असताना जवान सीमेवर भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी निघाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट

भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. भारतातर्फे ऑपरेशन सिंदूर राबविण्यात येत आहे. मात्र पाक तर्फे वेगवेगळ्या कुरापती सुरू आहेत. भारतीय सेना पाकला सडेतोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार येथील सुपुत्र जवान किशोर माळी हे भावाच्या लग्नासाठी आले असताना त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ते गावाकडे आल्यानंतर काही तासातच युद्धासाठी रवाना झाले. ते नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राहतात. तेथील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीपर गीते लावत मोठ्या संख्येने उपस्थित राहत जवानाला रवाना केले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Thane News: आईचा अपघाती मृत्यू, मुलीने वडिलांना कोर्टात खेचलं, 32 लाखांची भरपाई मिळाली

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करुन पर्यटकांची हत्या केली. या घटनेचे प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने सैनिकांमार्फत ऑपरेशन सिंदूर राबविले. या ऑपरेशनमध्ये भारताला यशही आले. परंतू आता सद्य स्थितीत भारत व पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकला सडेतोड उत्तर भारतीय सैन्यदल देत आहे. रजेवर असणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानांना सैन्य दलाकडून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी बोलविण्यात येत आहे. नंदुरबार येथील माळीवाड्यातील सुपुत्र असलेले सीआयएसएफचे जवान किशोर भगवान माळी हे 14 मे रोजी होणाऱ्या भावाच्या लग्नासाठी सुटी घेवून नंदुरबार येथे आपल्या गावी आले. परंतू लग्न कार्यक्रमात सहभागी होण्या अगोदरच जवान किशोर माळी यांना सैन्यदलाकडून कर्तव्यावर
रुजू होण्यासाठी बोलविण्यात आले. 

Advertisement