जाहिरात

Thane News: आईचा अपघाती मृत्यू, मुलीने वडिलांना कोर्टात खेचलं, 32 लाखांची भरपाई मिळाली

Thane News: आईचा अपघाती मृत्यू, मुलीने वडिलांना कोर्टात खेचलं,  32 लाखांची भरपाई मिळाली

ठाणे: 2021 मध्ये झालेल्या कार अपघातात आईचा मृत्यू झाल्यानंतर एका आठ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांविरोधात कोर्टात धाव घेत मोटार वाहन कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. याप्रकरणी ठाणे मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने मुलीच्या वडिलांना दोषी ठरवत (MACT) एका आठ वर्षांच्या मुलीला 32.41 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे संपूर्ण प्रकरण?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या कार अपघातात आईच्या मृत्यूप्रकरणी मुलीने कोर्टात धाव घेतली होती. मोटार वाहन कायद्याच्या कलम 166 अंतर्गत मुलीच्या कायदेशीर पालक म्हणून काम करणाऱ्या आजीमार्फत भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. ठाणे मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने मुलीच्या बाजूने निकाल देत  तिला 32 लाखांची भरपाई मंजूर केली, त्यासोबतच वडिलांना याप्रकरणी दोषीही ठरवले. 

24 डिसेंबर 2021 रोजी कुटुंब नांदेडहून महाराष्ट्रातील उमरखेडला जात असताना झालेल्या एका रस्ते अपघातानंतर हा खटला सुरु झाला होता.  प्रवासादरम्यान मुलीचे वडील चालवत असलेली कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ज्यामध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षक असलेल्या त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मुलीने आपल्या वडिलांविरोधात याचिका दाखल केली.

नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story

याप्रकरणी न्यायालयाने निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल मुलीच्या वडिलांना जबाबदार धरले आणि असे नमूद केले की वाहन वैध आणि व्यापक पॉलिसीद्वारे संरक्षित आहे.  तसेच न्यायाधिकरणाने हे मान्य केले की मृत व्यक्ती क्लिनिकल इन्स्ट्रक्टर म्हणून दरमहा 38, 411 रुपये कमवत होती. तसेच  भविष्यातील संभाव्यता आणि अंत्यसंस्कार खर्च यासारख्या भरपाईच्या इतर बाबींसह याचा विचार केला. त्यानंतर कोर्टाने एकूण भरपाईची रक्कम 64.52  लाख रुपये करण्यात आली. यामध्ये  वडील अत्याचाराचे आरोपी असल्याने न्यायाधिकरणाने अल्पवयीन मुलीला 50%  म्हणजेच 32.42 लाख रुपये - आणि याचिका दाखल केल्याच्या तारखेपासून ते वसूल होईपर्यंत 8% वार्षिक व्याज दिले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com