जाहिरात

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळावर 'हार्ड लँडिंग'चा थरार! 64 प्रवासी थोडक्यात बचावले; रात्री काय घडलं?

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना त्याचे चाक जमिनीवर जोरात आदळले. या 'हार्ड लँडिंग'मुळे विमानाला मोठा हादरा बसला, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होते.

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळावर 'हार्ड लँडिंग'चा थरार! 64 प्रवासी थोडक्यात बचावले; रात्री काय घडलं?

विशाल पुजारी, कोल्हापूर:

Kolhapur Airport News:  नवी मुंबईहून ६४ प्रवाशांना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या विमानाचा मंगळवारी रात्री मोठा अपघात टळला. धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे चाक जोरात आदळल्याने (हार्ड लँडिंग) प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुन्हा हवेत झेपावल्यामुळे (गो-अराऊंड) मोठा अनर्थ टळला.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंक कसा आहे? रोडचा फायदा काय? 'ही' आहेत वैशिष्ट्ये; A टू Z माहिती

कोल्हापूर विमानतळावर हार्ड लँडिंगचा थरार! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर विमानतळावर रात्री एक मोठी दुर्घटना टळली. नवी मुंबई ते कोल्हापूर विमानसेवेदरम्यान  रात्री 8 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास 64 प्रवाशांना घेऊन येणारं विमान कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना त्याचे चाक जमिनीवर जोरात आदळले. या 'हार्ड लँडिंग'मुळे विमानाला मोठा हादरा बसला, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होते.

विमान धावपट्टीकडे वेगाने येत असताना उंची कमी करताना चाकांचा जमिनीला जोराचा स्पर्श झाला. विमान धावपट्टीवर स्थिर होत  असताना घडलेली ही घटना घडली. धोक्याची घंटा ओळखून वैमानिकाने तात्काळ 'गो अराऊंड' करण्याचा निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत झेपावलं. कोल्हापूर शहरावर एक घिरटी मारल्यानंतर आरएमपी प्रणालीचा वापर करून काही वेळातच विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही मात्र  ​या घटनेने कोल्हापूर विमानतळावरील 'नाईट लँडिंग' सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं यातून दिसून येते. तांत्रिक सोयीसुविधा आणि धावपट्टीवरील सुरक्षितता उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

( नक्की वाचा : Nashik News :नाशिक TCS च्या इंजिनिअरला 'शीरखुरमा'तून दिले अंमली पदार्थ? धर्मांतरासाठी काळ्या जादूचा वापर! )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com