Kolhapur News: कोल्हापुरकरांना मिळणार 5 वर्षात 6 महापौर! भाजप- शिवसेनेचं ठरलं; काय आहे फॉर्म्युला?

भाजप- शिवसेनेमध्ये महापौर कोणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच कोल्हापूरात पुढील पाच वर्षात तब्बल सहा महापौर मिळणार असल्याचा नवा फॉर्म्युला तयार झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर:

Kolhapur Municiple Corporation Mayor News:  कोल्हापूर महानगरपालिकेत काठावर पास झालेल्या महायुतीमध्ये महापौर पदावरुन मोठी रस्सीखेच सुरु आहे. कोल्हापुरात महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असून 26 जागा मिळवल्या आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने 15 जागा मिळवल्यात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप- शिवसेनेमध्ये महापौर कोणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच कोल्हापूरात पुढील पाच वर्षात तब्बल सहा महापौर मिळणार असल्याचा नवा फॉर्म्युला तयार झाला आहे. 

कोल्हापुरकरांना 5 वर्षात मिळणार सहा महापौर..

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सत्तेची गणिते जुळवण्यासाठी महायुतीने आता नवा फॉर्म्युला आखला आहे. महायुतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी चक्क सहा महापौर देण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. दर दहा महिन्यांनी महापौरांची खुर्ची बदलणार असून, यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात प्रत्येकी तीन-तीन महापौर असे समसमान वाटप करण्यात आले आहे.

Advertisement

Malegaon News: अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती! मालेगावात भाजप-काँग्रेसची युती, इस्लाम पार्टीला देणार पाठिंबा?

काय आहे महायुतीचा फॉर्म्युला

​या निर्णयामुळे सत्तेच्या रिंगणात असलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न महायुतीने केला आहे. मात्र, यामुळे शहराच्या शाश्वत विकासाला खीळ बसणार की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजपचा पहिला महापौर हा अनुभवी चेहरा असेल, असे स्पष्ट करण्यात आले असले तरी, पक्षात अद्याप एका नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

विजयसिंह खाडे, रूपाराणी निकम आणि विशाल शिराळे या नावांची जोरदार चर्चा असली तरी, अंतिम निर्णय आता थेट मुंबईतून म्हणजेच प्रदेश पातळीवरून घेतला जाणार आहे. ​दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी शिंदे गटातही रस्सीखेच सुरू आहे. अर्चना पागर, अभिजित खतकर आणि सत्यजित जाधव यांची नावे शर्यतीत आहेत. सत्तेच्या या 'म्युझिकल चेअर'मध्ये कोल्हापूरच्या प्रश्नांना न्याय मिळणार की फक्त पदांची खिरापत वाटली जाणार, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला थेट सल्ला; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतरची प्रतिक्रिया Viral