VIDEO: IPS बिरदेव डोणेंचं आवाहन अन् गाडी पोहोचली! माजी CM शिंदेंच्या नातवाने दिलं अनमोल गिफ्ट.. पाहा VIDEO

IPS Birdev Done Latest News: भेटीला येणाऱ्या लोकांना त्यांनी बुके नको बूक आणा असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर आता त्यांना एक अनमोल गिफ्ट मिळालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर: युपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर कोल्हापूरचे सुपुत्र बिरदेव डोणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. घरची गरीबी, वडील मेंढपाळ असताना बीरदेव डोणे यांनी घेतलेली क्षितिज्यापल्याड झेप प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून या यशानंतर त्यांच्या जंगी मिरवणूका अन् सत्कार समारंभ होत आहे. तसेच त्यांच्या भेटीसाठीही लोकांची रीघ लागली आहे.  भेटीला येणाऱ्या लोकांना त्यांनी बुके नको बूक आणा असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर आता त्यांना एक अनमोल गिफ्ट मिळालं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापुरातील युपीएससी परीक्षा पास झालेल्या बिरदेव डोणेला राज्यभरातून विविध संघटना, खेळाडू, युवा उद्योजक, आणि राजकीय नेते भेट देतायत. बुके नको बुक द्या या बिरदेवच्या आवाहनालाही वाढता प्रतिसाद आहे. या आवाहनानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू, युवा उद्योजक आणि शिखर फाऊंडेशनचे सर्वेसर्वा शिखर पहारिया यांनी देखील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत तब्बल 1000 पुस्तके भेट दिली.

शिखर पहारिया यांनी युपीएससी एमपीएससी तयारीसाठी लागणारी 1000 पुस्तके भेट म्हणून त्यांच्या गावी यमगे येथे भेट म्हणून पाठवली. पुस्तकांनी भरलेली ही गाडी पाहून बिरदेव डोणेही हरखून गेले, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना लोकांकडून असंख्य पुस्तके भेट दिली जात असून या मिळालेल्या पुस्तकांचे एक गावामध्ये एक ग्रंथालय बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

दरम्यान,  मेंढपाळाच्या कुटूंबातून आलेले बिरदेव डोणे यांनी कष्टाच्या जोरावर आयपीएस पदाला गवसणी घातली. युपीएससीच्या निकालानंतर बिरदेव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच बिरदेव यांनी केलेल्या आवाहनाला आता माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाने साद घालत त्यांना खास भेट दिली. शिखर पहारिया संस्थेकडून बिरदेव यांच्या गावी 1000 पुस्तकांची भेट पाठवण्यात आली. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं