
भारताच्या सायबर सार्वभौमत्वावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न फसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि नियंत्रण रेषेवर सततच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर, पाकिस्तान आता भारताच्या डिजिटल सुरक्षेला आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा नेटवर्कच्या अभेद्य रचनेमुळे पाकिस्तानने आता आपले लक्ष सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कल्याणकारी आणि शैक्षणिक वेबसाइट्सकडे वळवले आहे. त्यातून भारतावर सायबर हल्ला करण्याचा त्यांचा डाव आहे. पण त्या क्षेत्रातही भारत पाकिस्तान पेक्षा वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रत्येक चालीला मात दिली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"आयओके हॅकर" इंटरनेट ऑफ खिलाफा गटाच्या नावाने काम करणाऱ्या सायबर हल्लेखोरांनी वेबसाइट्स विस्कळीत करण्याचा, ऑनलाइन सेवांमध्ये अडथळा आणण्याचा, आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेला त्याची भनक लागली. त्यांनी हे कोण करत आहे याचा शोध घेतला. त्यानंतर हे सीमापार पाकिस्तानातून केलं जात असल्याचं समोर आले. त्यामुळे पाकिस्तान काही ना काही काड्या करण्याच्या प्रयत्नात आहे हे परत एकदा समोर आले आहे.
गुप्तचर अहवालानुसार, चार संबंधित घटनांची नोंद झाली आहे. श्रीनगरमधील आर्मी पब्लिक स्कूल आणि एपीस रानीखेत यांच्या वेबसाइट्सवर सायबर हल्ला करण्यात आला. तर एपीस श्रीनगरवर डिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिसवर ही असाच सायबर हल्ला करण्यात आला. आर्मी वेलफेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशनच्या डेटाबेसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. तर त्याच वेळी भारतीय हवाई दल प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पोर्टलला देखील लक्ष्य करण्यात आले. पण या चारही वेबसाइट्स ला पाकडे नुकसान पोहोचवू शकले नाही. शिवाय कोणत्याही संवेदनशील किंवा कार्यात्मक नेटवर्कला कोणतेही नुकसान झाले नाही.
पाकिस्तानचे अयशस्वी प्रयत्न शत्रूची वाईट इच्छा तसेच त्यांची मर्यादित क्षमता देखील उघड करतात. भारतीय सैन्य आपल्या सायबर स्पेसच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सतर्क आणि कटिबद्ध आहे. आपली सायबर क्षमता मजबूत करत आहे आणि सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची डिजिटल सुरक्षा सुनिश्चित करत आहे. त्यामुळे पाकिस्तानने किती ही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही हे स्पष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world