जाहिरात

Kolhapur News : सैन्यात लढताना पतीचं निधन, ती खचली नाही; कोल्हापुरच्या रणरागिणीची मोठी झेप

Kolhapur Inspirational Story : आधी सासऱ्याचं निधन, त्यानंतर पतीची साथही गमावली. मात्र कोल्हापुरची रणरागिणी खचली नाही.

Kolhapur News : सैन्यात लढताना पतीचं निधन, ती खचली नाही; कोल्हापुरच्या रणरागिणीची मोठी झेप
सासराच्या निधनानंतर काही दिवसात पतीच सैन्यात कार्यरत असताना मृत्यू झाला. दु:खाचा डोंगर सावरत ती लेकीसाठी उभी राहिली

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur Inspirational Story : कोल्हापूरच्या रणरागिणीचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. हातकणंगले तालुक्यातील तारदाळच्या प्रियंका निलेश खोत (Priyanka Nilesh Khot becomes Lieutenant) यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. वीरपत्नीच्या कोट्यातून एका जागेवर कोल्हापुरातील महिलेची नियुक्ती झाली आहे. सासऱ्यांचं निधनानंतर दीड महिन्यातच तिच्या डोक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि पती निलेशचं सैन्यात कार्यरत असताना निधन झालं. दुहेरी दुःखानंतर अडीच वर्षांच्या चिमुकलीला कुटुंबाकडे सोपवून चेन्नई येथील सैन्याचे कठीण प्रशिक्षण पूर्ण करून प्रियंका यांनी मिळवलेले यश खोत कुटुंबासाठी अभिमानास्पद ठरलं आहे. 

कोल्हापूरच्या (Kolhapur News) एका रणरागिणीने पतीच्या निधनानंतर जिद्दीच्या बळावर  भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. हातकणंगले तालुक्यातील तारदाळच्या प्रियंका निलेश खोत यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवून यश मिळवलं आहे. वीरपत्नीच्या कोट्यातून देशात एकच जागा असलेल्या पदावर या महिलेचं यश हे कोल्हापूरकरांसाठी गौरवास्पद आहे.

सैन्यात रुजू झाल्यानंतर दीड महिन्यात पतीचं निधन...

प्रियांका यांचे पती नीलेश हे सैन्य दलात असल्याने सैन्य दलाविषयी प्रियंका यांना बरीच माहिती होती. दुर्दैवाने पती निलेह खोत यांचं सैन्यात कार्य बजावताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर प्रियांका यांनी सुरुवातीला बँकिंग स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी केली होती. परंतु, सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनी सैन्य दलात सहभागी होण्याची संधी कशी आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेबाबतही माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकारी पदाची पूर्ण तयारी सुरु केली. अडीच वर्षांच्या चिमुकलीला कुटुंबाकडे सोपवून त्यांनी चेन्नई येथील सैन्याचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या अधिकारी बनल्या.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - True Story : जीव द्यायला गेली, पण मगरीने वाचवलं ! अंगावर काटा आणणारी सत्यकथा

2022 साली सासऱ्यांचं निधन आणि पुढच्या दीड महिन्यातच सैन्यात कार्यरत असलेल्या पती निलेश खोत यांचा हृदयविकाराने मृत्यू या जबर धक्क्यानंतरही प्रियंका डगमगल्या नाहीत. वीरपत्नी कोट्यातील देशभरातील अवघ्या एका जागेवर बाजी मारत त्यांनी देशसेवेची वाट धरली. प्रियंका यांनी मिळवलेले यश खोत कुटुंबासाठी अभिमानास्पद ठरलं आहे. कोल्हापुरात गावकऱ्यांनी भव्य मिरवणुकीत त्यांचा गौरव केला. संकटांपलीकडे जाऊन कुटुंबाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करणारी ही वीरपत्नी आज कोल्हापूरचंच नव्हे तर संपूर्ण राज्यातील महिलांसाठी आदर्श आणि प्रेरणास्रोत ठरली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com