जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: ब्लकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सून्न करणारी सुसाईड नोट

निकिताने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि दीड महिन्यापूर्वीच ती शहरात नोकरीसाठी आली होती. आविष्कार कॉलनीतील एका खोलीत राहून ती वोक्हार्ट नावाच्या कंपनीत नोकरी करत होती.

Chhatrapati Sambhajinagar: ब्लकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सून्न करणारी सुसाईड नोट

सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर

फार्मसिस्ट असलेल्या 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार कॉलनीतमधून उघडकीस आली आहे. तरुणीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहिली आहे. 'मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा' असं लिहून तरुणीने आयुष्य संपवलं आहे. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. निकिता रवींद्र पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील वांजूळ पोही येथील होती.

निकिताने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि दीड महिन्यापूर्वीच ती शहरात नोकरीसाठी आली होती. आविष्कार कॉलनीतील एका खोलीत राहून ती वोक्हार्ट नावाच्या कंपनीत नोकरी करत होती. तिच्यासोबतच्या इतर दोन मैत्रिणी सुट्ट्यांमुळे गावी गेल्या होत्या, त्यामुळे ती खोलीत एकटीच होती.

(नक्की वाचा-  Pune News: ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेचा दणदणाट)

शनिवारी निकिता कामावर गेली नाही, म्हणून शेजारील खोलीतील मुली तिला मेसवर जाण्यासाठी बोलवायला आल्या. मात्र, निकिताने दरवाजा उघडला नाही. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

निकीताच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून एक महत्त्वाची माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, 'तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.' असे असूनही, तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून 25 कॉल आले होते.

(नक्की वाचा- Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय)

पोलिसांकडून मोबाइलची तपासणी सुरू

निकिताच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सिडको पोलीस करत आहेत. पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाइलमधून तिला कोण ब्लॅकमेल करत होते आणि तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

निकिताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 'मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा' अशी तिने लिहिलेली सुसाईड नोट तिच्या वेदना व्यक्त करते. या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com