Kolhapur News : धक्कादादायक! 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू

Kolhapur News: कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kolhapur News :रचना चौगले  असं या महिलेचं नाव आहे.
कोल्हापूर:


विशाल पुजारी, प्रतिनिधी

कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे. संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनी या ठिकाणी ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रचना चौगले  असं या महिलेचं नाव आहे. आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पाडला होता. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलेलं. या दुर्दैवी  घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी पहाटे पीयुषा भूक लागल्याने रडत होती. रचना यांनी नेहमीप्रमाणे तिला जवळ घेत दूध पाजलं. काही वेळाने बाळ झोपलं.. पण एक तासानंतर पुन्हा रडू लागलं. यावेळी मात्र रचना उठली नाही. तिच्या आईने हाक मारली, तरी काहीच प्रतिसाद नव्हता.

मग नवऱ्याने रचनाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्या उठल्याच नाहीत. पुढे नातेवाईक रचनाला रुग्णालयात घेऊन गेले मात्र  उपचारापूर्वीच रचनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Advertisement

रचना चौगले या आशा वर्कर म्हणून काम करत होत्या.. त्यामुळे प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर काय खबरदारी घ्यावी, याची चांगली कल्पना त्यांना होती. यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काहीच तक्रार नव्हती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

Topics mentioned in this article