Kolhapur News : खळबळजनक! कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्यासमोर लावणी? Viral Video चा ग्रामस्थांनी केला पर्दाफाश

Kolhapur Viral Video Controversy:  कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kolhapur News :  या कार्यक्रमातील एका नृत्यांगनेच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur Viral Video Controversy:  कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अश्लील नृत्य केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता, मात्र ग्रामस्थांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत वस्तुस्थिती समोर आणली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

वडणगे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त वडणगे ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या पटांगणात विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी लावणी आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला.

 या कार्यक्रमातील एका नृत्यांगनेच्या नृत्याचा काही सेकंदाचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल करताना महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अशा प्रकारचे नृत्य सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला, ज्यामुळे वादाला तोंड फुटले.

( नक्की वाचा : Kolhapur News: कोल्हापुरात रस्ते बांधकामात महाघोटाळा? मनसेचा आक्रमक पवित्रा, अधिकाऱ्यांची पळापळ )
 

सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि वस्तुस्थिती

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गावात आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये तथ्य नाही. ग्रामपंचायत इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, हे खरे असले तरी कार्यक्रम सुरू असताना योग्य ती खबरदारी घेतली जाते. 

व्हायरल व्हिडिओमध्ये कुठेही महापुरुषांचा पुतळा दिसत नाही, तरीही केवळ खोडसाळपणातून चुकीचा संदेश पसरवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

( नक्की वाचा : Pune News : खळबळजनक! इंदापूर तालुक्यात 25 मुली जिहाद्यांच्या ताब्यात? पडळकरांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला )

ग्रामपंचायतीची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणावर वडणगे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत इमारतीसमोरील स्टेजवर दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यावर्षी देखील महाशिवरात्रीनिमित्त 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. 

Advertisement

ग्रामपंचायत कार्यालयात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कार्यालय बंद झाल्यानंतर आत सुरक्षित असतो. लावणीचा कार्यक्रम सुरू असताना देखील पुतळा झाकून आणि शटर ओढूनच स्टेजवर सादरीकरण करण्यात आले होते. कोणाच्याही भावना दुखावणारा प्रकार गावात घडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खोडसाळपणा करणाऱ्याचा शोध घेणार

या व्हिडिओमुळे गावची बदनामी होत असल्याचा सूर उमटत आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार आलेली नसताना केवळ सोशल मीडियावर संभ्रम निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गावातील मनोरंजनासाठी आयोजित कार्यक्रमाचा चुकीचा संदर्भ देऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ग्रामपंचायतीने दिलगिरी व्यक्त केली असली तरी, व्हायरल व्हिडिओमधील दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Advertisement

इथे पाहा संपूर्ण Video

Topics mentioned in this article