
Konkan Railway Ganpati Special Train Booking: लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या एका महिन्यांवर आला आहे. यावर्षी बुधवार २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. अशातच आता कोकणच्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 25 जुलैपासून गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग 25/07/2025 पासून सुरु होणार आहे. सर्व प्रवासी आरक्षित प्रणाली, ऑनलाईन इंटरनेट तसेच www.irctc.co.in या वेबसाईटवरुन ही तिकीटे बुकिंग करण्यात येतील. कोकण रेल्वेकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे.
या आहेत गणपती स्पेशल गाड्या
1) ट्रेन क्रमांक 01152: सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
२) ट्रेन क्रमांक 01172: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (T) स्पेशल (डेली)
३) ट्रेन क्रमांक 01154: रत्नागिरी - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
४) ट्रेन क्रमांक 01104: सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी स्पेशल (डेली)
५) ट्रेन क्रमांक 01167: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (T) स्पेशल (डेली)
६) ट्रेन क्रमांक 01166: मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक (T) स्पेशल (साप्ताहिक)
७) ट्रेन क्रमांक 01186: मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक (T) विशेष (साप्ताहिक)
८) ट्रेन क्रमांक 01130: सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक)
९) ट्रेन क्रमांक 01446: रत्नागिरी - पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)
१०) ट्रेन क्रमांक 01448: रत्नागिरी - पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक)
Bookings for Ganapati Special Trains 2025. pic.twitter.com/tufx4lHNM2
— Konkan Railway (@KonkanRailway) July 22, 2025
दरम्यान, वरील गाड्यांच्या थांब्या आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या. तसेच प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world